• Download App
    एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या केली म्हणजे त्यांना कळेल; स्वप्नीलच्या आईचा ठाकरे – पवार सरकारविरोधात तळतळाट...!! swapnil lonkar`s mother chhaya lonkar targets thackeray - pawar govt over MPSC issue

    एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या केली म्हणजे त्यांना कळेल; स्वप्नीलच्या आईचा ठाकरे – पवार सरकारविरोधात तळतळाट…!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे – एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकरने आत्महत्येचे पाऊल उचलले. त्याला ते पाऊल उचलावे लागले. कारण तो एमपीएससी पास झाला होता. पण इंटरव्ह्यू होत नव्हता. त्याच्या आईच्या दुःखाला पारावार उरलेला नाही. स्वप्नीलची आठवण काढत तिने हंबरडा फोडलाय… एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या केली म्हणजे त्यांना समजेल. हा माझा तळतळाट आहे, असे काळीज चिरून टाकणारे उद्गार स्वप्नीलच्या आईने काढले. swapnil lonkar`s mother chhaya lonkar targets thackeray – pawar govt over MPSC issue

    जी स्वप्नीलच्या आईचे तीच एमपीएससीच्या लाखो विद्यार्थ्यांची भावना आहे. या मंत्र्यांना १२ आमदारांच्या नियुक्तीचे पडलेय. त्यांना विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी काही देणेघेणे नाही. मुख्यमंत्र्यांचा २८ वर्षांचा मुलगा थेट मंत्री होतो. पण सामान्य गरीबांच्या मुलांचे भवितव्य टांगणीला लागले आहे, अशा शब्दांमध्ये अनेकांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

    स्वप्नीलची आई छाया लोणकर यांनी तर अतिशय तीव्र शब्दांमध्ये आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली. त्या म्हणाल्या, की माझा हा तळतळाट आहे. एखाद्या मंत्र्यांच्या मुलाने आत्महत्या करावी. त्याच्याशिवाय या सरकारला कळणार नाही. आत्महत्या काय असते? मुलगा जाण्याचे दुःख काय असते. त्यांना नाही कळणार. त्यांची नुसती भांडणं चाललीत… जगात काय चाललेय त्यांना काही देणेघेणं नाही. कोण किती सोसतेय… कोण काय करतेय त्यांना काही नाही.

    त्यांचे फक्त राजकारण चाललंय. पण मला माहितीये माझं पोरंग किती झुरायचं… दोन वर्ष माझं पोरंग किती झुरलं. आई, इंटरव्ह्यू झाला नाही, असं म्हणायचं. मी पास झालो, इंटरव्ह्यू नाही झाला. दोन वर्षात किती झुरलं मला माहितीये. तो माझ्याशी बोलायचा. त्यांना काही देणंघेणं नाही…. त्यांची मुलं सुरक्षित आहेत… गरिबांची काय कितीही मेली, तरी त्यांना काही देणंघेणं नाही,” असे शब्दांचे आसूड छाया लोणकर यांनी ठाकरे – पवार सरकारवर ओढले.

    swapnil lonkar`s mother chhaya lonkar targets thackeray – pawar govt over MPSC issue

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!