विशेष प्रतिनिधी
सोलापूर : कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांनी आपली मुलगी प्रणिती शिंदे हिला मंत्रीमंडळात जाण्यास अडचण होऊ नये यासाठी कॉँग्रेसच्याच आमदाराला पाडल्याचा आरोप माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केला आहे.Sushilkumar Shinde ousts Congress MLA for Praniti Shinde’s ministerial post, former ministers allege
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेल्या लक्ष्मण ढोबळे यांनी म्हटले आहे की, आपल्या मुलीला म्हणजेच आमदार आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळात अडचण निर्माण होऊ नये म्हणून सुशीलकुमार शिंदे यांनीच अक्कलकोटचे कॉंग्रेसचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना निवडणुकीत पाडले होते.
ढोबळे म्हणाले की, आपल्या विरोधात उमेदवार कोण असावा हे देखील सुशीलकुमार शिंदेच ठरवत आले आहेत. परंतु राज्य मंत्रिमंडळात मंत्री होण्यासाठी आपल्या मुलीला अडचण होऊ नये म्हणून म्हेत्रेंना पाडण्याचे काम सुशीलकुमार शिंदे यांनीच केले आहे.
ढोबळे म्हणाले, काही दिवसांपूर्वी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात स्मार्टसिटीच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला. आता शहर उत्तर मतदारसंघात आम्ही लक्ष घालणार आहोत. मात्र ताई माझे तुम्हाला आव्हान आहे की, तुम्ही शहर उत्तर मधून विधानसभा निवडणूक लढवून दाखवा.
एकदा लढाई होऊन जाऊद्या. उगाच नुरा कुस्ती करणाºयांनी राजकारणावर बोलू नये. पाण्याच्या प्रश्नावर बोलण्याचा अधिकार तुम्हाला जरुर आहे मात्र दुहेरी जलवाहिनीवर तुम्ही बोलू नये. ते काम आम्ही नक्की करुन दाखवू. तुम्ही एकदा वाढपी बदलून बघा.
दरम्यान यावर प्रत्युत्तर देताना कॉँग्रेसने म्हटले आहे की, लक्ष्मणराव ढोबळे यांच्या वक्तव्यात फार दम नाही. सुशीलकुमार शिंदेंनी माजी आमदार म्हेत्रे यांना पाडले असते तर आज सरकार येवून १८ महिने झाले मग प्रणिती शिंदे मंत्री का झाल्या नाहीत.
त्यामुळे ढोबळेंनी पक्षप्रवेश करून दोन वर्षे लोटली. मात्र त्यांना भाजपमध्ये कोणीच विचारत नाहीत. केवळ सोलापुरच्या खासदारकीवर डोळा ठेवून चापलुसी करण्याचा ढोबळेंची स्वभाव असल्याने त्यांच्या वक्तव्याला फारसे महत्व देत नाही.
Sushilkumar Shinde ousts Congress MLA for Praniti Shinde’s ministerial post, former ministers allege
महत्त्वाच्या बातम्या
- Johnson And Johnson ने भारतातील लसीच्या मंजुरीसाठीचा अर्ज घेतला मागे, कारण अद्याप अस्पष्ट
- सहाव्या निकाहच्या तयारीत असलेल्या यूपीच्या माजी मंत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल, तिसऱ्या पत्नीने तीन तलाकवरून पोलिसांत घेतली धाव
- सांगलीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्याला व्यापाऱ्यांकडून रोखण्याचा प्रयत्न, भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची