प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज 9 डिसेंबर 2022 रोजी स्वतःच्या नेतृत्वाखाली सीमा प्रश्नावर सर्वपक्षीय खासदारांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला. पण त्यांनी जेव्हा शिंदे गटाचे खासदारही आपल्याबरोबरच्या शिष्टमंडळात घेण्याचे प्रयत्न केले, त्यावेळी मात्र ठाकरे गटाच्या खासदारांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने आणि खासदार श्रीरंग बारणे हे गृहमंत्री अमित शहा यांना न भेटताच त्यांच्या दालनातून निघून गेले. परंतु ठाकरे गटाच्या या राजकीय विरोधामुळे सुप्रिया सुळे यांचा सर्वपक्षीय नेतृत्वाचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. Supriya Sule’s all-party leadership effort while meeting Amit Shah on border issue
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचे मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या खासदारांनी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यावेळी सुप्रिया सुळे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार बरोबर होते तसेच काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकरही त्यांच्या समावेत होते.
अमित शाह यांच्या दालनात जाताना खासदार धैर्यशील माने शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने आणि खासदार श्रीरंग बारणे तिथे आले. त्यांना पाहताच ठाकरे गटाच्या खासदारांचा पारा चढला आणि त्यांनी शिंदे गटाच्या या खासदारांना आपल्याबरोबर घेण्यास विरोध केला. शिंदे गटाचे खासदार शिष्टमंडळात असतील तर आम्ही त्यात समाविष्ट होणार नाही, असे त्यांनी सुप्रिया सुळे यांना सांगितल्याच्या बातम्या मराठी प्रसार माध्यमांनी दिल्या आहेत. परंतु ठाकरे गटाच्या या आक्रमक भूमिकेमुळे सुप्रिया सुळे यांचा सर्वपक्षीय खासदारांचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.
सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांसमवेत अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांचे सीमा प्रश्नाबाबतचे सर्व म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्याबद्दल आभार व्यक्त करणारे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
Supriya Sule’s all-party leadership effort while meeting Amit Shah on border issue
महत्वाच्या बातम्या
- राज्यसभेत बहुमताने समान नागरी कायदा खासगी विधेयक सादर; विरोधकांचा सूर तीव्र
- हिमाचलात काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची संगीत खुर्ची जोरात; केंद्रीय पक्ष निरीक्षक म्हणतात, इथे वाद नाही
- महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधात कायदा?; शिंदे – फडणवीस सरकार बाकीच्या राज्यांतील कायद्यांचा अभ्यास करणारठावर पास व्हायला धडपडतीये