प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचे पिल्लू महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात चर्चेसाठी सोडून दिले आहे.
Supriya Sule, Dhananjay Munde defected to Shiv Sena
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तुळजापूर दौऱ्यात भवानी मातेचे दर्शन घेऊन महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम कर. चांगला पाऊस पडू दे. बळीराजाचे राज्य येऊ दे, असे साकडे घालत पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा झाला तर सगळा पक्ष घेऊन दर्शनाला येईन, असा नवस बोलला आहे.
सुप्रिया सुळे यांच्या विधानातून हिंट घेऊन राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी साताऱ्यात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, असे विधान करून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडवली आहे.
सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यावर शिवसेनेने अजून कोणतेही उत्तर दिले नाही, पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचाच मुख्यमंत्री करण्यावर नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून ठाम आहेत. त्यामुळे नाना पटोले यांनी सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांना प्रत्युत्तर देताना महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण हे जनता ठरवेल. स्वप्न बघण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण काही लोक दिवसा सो स्वप्न बघत असतात त्याला आपण काय करणार?, असा खोचक सवाल करत टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेला डिवचत आहेत. पण तो बाण काँग्रेसच्या दिशेने जाऊन नाना पटोले यांना लागल्याने त्यांनी राष्ट्रवादीवर उलटा बाण सोडला आहे.
Supriya Sule, Dhananjay Munde defected to Shiv Sena
महत्वाच्या बातम्या
- आयसीसीआर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा जगभरात वाजणार डंका!!
- राज्यसभा निवडणूक : हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची 3 मते भाजपला?? ठरणार का गेम चेंजर??
- कानपूर हिंसाचार : सीएम योगींनी रात्री उशिरा बोलावली बैठक, म्हणाले- कंटकांवर लागणार गँगस्टर, मालमत्तेवर चालवणार बुलडोझर
- सुप्रिया सुळे : तुळजापुरातलं नवसाचं मुख्यमंत्रिपद पुण्यात येताच ताटातलं वाटीत आलं!!