• Download App
    सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला इशारा ; 'उत्तर दिलं नाही तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आरक्षण रोखू 'Supreme Court warns central government; 'If not answered, we will stop financially weak reservation'

    सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला इशारा ; ‘उत्तर दिलं नाही तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आरक्षण रोखू ‘

    २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने १०% आर्थिक आरक्षण लागू केलं होतं. या आरक्षणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्चा न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.Supreme Court warns central government; ‘If not answered, we will stop financially weak reservation’


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केला आहे की , आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ८ लाख वार्षिक उत्पन्नाची मर्यादा कुठून आणली? या प्रश्नावर केंद्र सरकारने उत्तर दिलं नाही तर आरक्षण जाहीर करणारा अध्यादेशच स्थगित करु, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

    २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने १०% आर्थिक आरक्षण लागू केलं होतं. या आरक्षणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्चा न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्या सुनावणीदरम्यान हा महत्त्वपूर्ण सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला केला आहे.



    सुप्रीम कोर्टाचं हे म्हणणं आहे की, ओबीसींप्रमाणे EWS घटक हा काही सामाजिक दृष्ट्या मागास नाहीये, मग असं असताना या दोन वर्गांसाठी एकच निकष कसा लागू केला जाऊ शकतो, असा कोर्टाचा सवाल आहे.

    ७ ऑक्टोबरच्या मागच्या सुनावणीत कोर्टाने याबाबतच्या खुलाश्याच्या अहवालाची मागणी केली होती. मात्र, तो अहवाल अद्याप सादर करण्यात आला नाहीये. जर अहवाल सादर केला गेला नाही, तर या अध्यादेशालाच स्थगिती देण्याचा इशारा कोर्टाने सरकारला दिला आहे.

    Supreme Court warns central government; ‘If not answered, we will stop financially weak reservation’

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!