• Download App
    सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई महापालिकेचे कौतुक, कोरोना नियंत्रण कामात चर्चा करण्याचा केंद्राला सल्ला|Supreme court appreciate Mumbai carporatin

    सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई महापालिकेचे कौतुक, कोरोना नियंत्रण कामात चर्चा करण्याचा केंद्राला सल्ला

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईत कोविड प्रतिबंधासाठी आणि नियोजनासाठी महानगरपालिकेने केलेल्या कामाचे कौतुक सर्वोच्च न्यायालयाने केले.Supreme court appreciate Mumbai carporatin

    मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशी चर्चा करून तेथे काय उपाय करण्यात आल्या याची माहिती घ्यावी, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला दिले.



    न्या. धनंजय चंद्रचूड यांनी कोविड परिस्थिती हाताळण्यासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या कामाचे कौतुक केले. मुंबईत कोविड नियंत्रण आणि नियोजनात चांगले काम केले असल्याचे प्रसिद्धीमाध्यमांच्या मार्फत समजत आहे.

    मुंबईने काय केले हे पाहणेही गरजेचे आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव आणि दिल्लीच्या आरोग्य सचिवांनी पालिका आयुक्त चहल यांच्याशी चर्चा करावी. तेथील व्यवस्थेबाबत माहिती घ्यावी, असे न्यायमूर्तींनी निर्देशात म्हटले आहे.

    सॉलिसीटर जनरल यांनीही कोविड काळातील मुंबईचे काम उल्लेखनीय असल्याचे नमूद केले. उत्तर भारतात कोविडचा कहर वाढत असताना दुसऱ्या बाजूला मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील कोविड संसर्ग नियंत्रणात येत आहे. त्याबद्दल केंद्र सरकारनेही महाराष्ट्र आणि मुंबईचे कौतुक केले आहे.

    Supreme court appreciate Mumbai carporatin

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस