• Download App
    विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी अर्जातील चुका दुरुस्तीची आजपासून संधी|student can change in cet form

    विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी अर्जातील चुका दुरुस्तीची आजपासून संधी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – राज्य शिक्षण मंडळाकडून अकरावीच्या प्रवेशासाठीच्या सीईटीसाठीच्या अर्जदार विद्यार्थ्यांना त्यातील चुका दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे.अर्जात बदल करण्यासाठी विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन अॅप्लिकेशन क्रमांक आणि संगणक प्रणालीतील मोबार्इल क्रमांक टाकून लॉगीन करता येईल.student can change in cet form

    विद्यार्थ्यांना सोमवार, २ ऑगस्टच्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत ही मुभा असेल. ई-मेल आयडी, मोबार्इल क्रमांक, परीक्षेचे माध्यम, सेमी इंग्रजीचा विकल्प, सामाजिक शास्त्र विषयांच्या प्रश्नांचे माध्यम, निवासी पत्ता, परीक्षा केंद्रासाठी निवडलेला जिल्हा, विभाग, एसईबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गासंदर्भात माहिती भरताना चुका झाल्या



    असल्यास त्या दुरुस्त करता येणार आहेत.सीईटीची नोंदणी करताना अनेक विद्यार्थ्यांनी अधिक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्याने मंडळाकडून दुरुस्तीचा हा पर्याय दिल्याचेही सांगण्यात आले.

    ज्या विद्यार्थ्यांनी अनेक अर्ज आणि पर्याय दिले आहेत, अशा विद्यार्थ्यांचा केवळ एकच अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहे. जादाचे अर्ज विद्यार्थ्यांनी काढून टाकावेत. ही सुविधा १ ऑगस्ट सकाळी ११ वाजल्यापासून आहे.

    student can change in cet form

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Bachchu Kadu : बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; चर्चा अयशस्वी ठरल्यास ‘रेल रोको’चा इशारा

    Mazi Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लवकरच ऑक्टोबरचा लाभ मिळणार; 410.30 कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता

    Nilesh Ghaiwal, : लंडनमध्ये नीलेश घायवळचा ठावठिकाणा सापडला; यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती