- महाराष्ट्रात काही ठिकाणी कँटोनमेन्ट झोन तयार केली जातील आणि त्याच्या बाहेर लोकांना प्रावेश करता येणार नाही. Strict restrictions like West Bengal are likely to be imposed in the state, Vijay Vadettiwar warned of a lockdown
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशात आणि राज्यात कोरोनाने हाहाकार केला असून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी पश्चिम बंगाल येथे कडक निर्बंध केले आहेत. दरम्यान असेच कडक निर्बंध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात पण लागू करण्याची शक्यता आहे असे म्हणत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाउनचा सूचक इशारा दिला आहे.
पश्चिम बंगाल येथे शाळा वगैरे सगळं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान महाराष्ट्रात काही ठिकाणी कँटोनमेन्ट झोन तयार केली जातील आणि त्याच्या बाहेर लोकांना प्रावेश करता येणार नाही.तसेच शाळा आणि रेल्वे हे निर्णय लॉकडाऊनमध्ये होत असतात. रेल्वेमध्ये गर्दी होत आहे.त्यावर मुख्यमंत्री गंभीर आहेत पण तो निर्णय कॅबिनटेमध्ये होईल.कॅबिनेटमध्ये चर्चा होईल परंतु निर्बंधांबाबतचा निर्णय अपेक्षित असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण व्हावे यासाठी आमची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे असे वडेट्टीवार यांनी सांगितले.