• Download App
    ST Strike : एसटीच्या विलिनीकरणाबाबत समितीच्या अहवालानंतर निर्णय घेऊ, परिवहनमंत्री अनिल परब यांची माहिती । ST Strike We will take a decision after the committee's report on the merger of ST, says Transport Minister Anil Parab

    ST Strike : एसटीच्या विलिनीकरणाबाबत समितीच्या अहवालाला १२ आठवड्यांचा अवधी, त्यानंतरच निर्णय, अनिल परबांची सभागृहात माहिती

    ST Strike : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एस.टी) शासनात विलिनीकरण करावे या मागणीवर अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली असून या समितीला बारा आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे. या समितीच्या अहवालानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले. ST Strike We will take a decision after the committee’s report on the merger of ST, says Transport Minister Anil Parab


    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एस.टी) शासनात विलिनीकरण करावे या मागणीवर अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली असून या समितीला बारा आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे. या समितीच्या अहवालानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

    ॲड.परब म्हणाले, संपापूर्वी कृती समितीसोबत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले गेले होते, तरी संप सुरू राहिला. यामध्ये विलिनीकरणाचा मुद्दा लावून धरण्यात आला. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नेमलेली ही समिती कामगार, युनियनसह सर्व बाजू ऐकून घेऊन शासनास अहवाल सादर करणार आहे.

    राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली असून देशातील कोणत्याही राज्यात मिळणाऱ्या पगाराएवढा पगार आता या कर्मचाऱ्यांना मिळत आहे. हा पगार दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत नियमित जमा होईल याची हमी सुद्धा राज्य शासनाने घेतली आहे, अशी माहिती परिवहनमंत्री श्री. परब यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देतांना दिली.

    संपादरम्यान राज्याचे सुमारे साडे सहाशे कोटी रुपयांचे नुकसान झाले असून सामान्य जनता यामुळे वेठीस धरली गेली. कामावर परत येण्याचे वारंवार आवाहन करुनही अनेक कर्मचारी कामावर परतले नाहीत. त्यांच्यावर केलेल्या निलंबनाची कार्यवाही मागे घेण्याचे आश्वासन देऊनही कामावर परतले नव्हते. त्यामुळे जे कर्मचारी बडतर्फ झाले आहेत त्यांना कामावर घेता येणार नाही त्यासाठी वेगळी प्रक्रिया लागेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    या विषयाच्या अनुषंगाने सदस्य रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या विषयावरील चर्चेत सर्वश्री शशिकांत शिंदे, परिणय फुके, गोपीचंद पडळकर यांनी सहभाग घेतला.

    ST Strike We will take a decision after the committee’s report on the merger of ST, says Transport Minister Anil Parab

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan High Commission : पंजाबमध्ये दोन पाकिस्तानी हेरांना अटक; दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयात लष्कराची माहिती पाठवत होते, ऑनलाइन पेमेंट घेत होते

    Hamas support : पुण्यात हमास समर्थनाचे पोस्ट वाटणाऱ्या तरुणांना जमावाची मारहाण; परिसरात तणावाचे वातावरण; VIDEO व्हायरल

    Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींचे आदेश- तिकडून गोळ्या चालल्यास, इकडून गोळे चालतील