• Download App
    नांदेड : सिलिंडर विकत घ्यायचा की, घरात किराणा भरायचा ; उज्वला योजनेमुळे लाभार्थ्यांच्या डोळ्यात आले पाणी|Nanded: To buy cylinders, to fill the house with groceries; Tears came to the eyes of the beneficiaries due to Ujwala Yojana

    नांदेड : सिलिंडर विकत घ्यायचा की, घरात किराणा भरायचा ; उज्वला योजनेमुळे लाभार्थ्यांच्या डोळ्यात आले पाणी

    नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यात सिलिंडर गॅसचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात जवळपास तीन लाखावर उज्वला योजनेचे लाभार्थी आहेत.Nanded: To buy cylinders, to fill the house with groceries; Tears came to the eyes of the beneficiaries due to Ujwala Yojana


    विशेष प्रतिनिधी

    नांदेड : केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून उज्ज्वला योजना सुरु केली. मात्र, सिलिंडरचे भाव वाढल्याने लाभार्थी महिलांच्या डोळ्यात पाणी आले आहे.उज्वला योजनेतंर्गत नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यात सिलिंडर गॅसचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात जवळपास तीन लाखावर उज्वला योजनेचे लाभार्थी आहेत.

    मात्र, गेल्या काही महिन्यांत सिलिंडरचे भाव चांगलेच वाढत चालले आहेत. ९५० रुपयाला सिलिंडर घेणे सामान्य परिवाराला परवडत नाही. त्यातही सबसिडीही जवळपास बंदच झाली आहे. सिलिंडर विकत घ्यायचा की, घरात किराणा भरायचा, असा प्रश्न लाभार्थी कुटुंबाला पडत आहे.



    सिलिंडर धुळखात ठेवून ग्रामीण भागातील महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करता यावा, यासाठी जंगलात फिरून सरपण गोळा करताना दिसत आहे. चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी महिलांना रॉकेल लागत होते. उज्वला योजनेतून सिलिंडर देत असताना रॉकेलला कात्री लावण्यात आली.त्यामुळे लाभार्थ्यांना मिळणारे रॉकेलही बंद झाले.

    उज्वला योजनेचा हेतू

    गरिब दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या लाभार्थ्यांना स्वयंपाकाचा गॅस मिळावा तसेच जंगलतोड व चुलीमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे, यासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेतंर्गत गॅसचे वितरण केले. त्याला प्रतिसादही मिळाला. घराघरात सिलिंडर पोहोचला.

    Nanded: To buy cylinders, to fill the house with groceries; Tears came to the eyes of the beneficiaries due to Ujwala Yojana

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : नॉर्वेने PM मोदींना सर्वोच्च सन्मान प्रदान केला; हा त्यांचा 32वा आंतरराष्ट्रीय सन्मान; मोदी म्हणाले- युरोप भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल

    तामिळनाडूत सगळ्या अम्मा कॅन्टीनच्या नूतनीकरणाचे आदेश; मुख्यमंत्री विजयच्या एकाच झटक्यात अण्णा द्रमूक आणि द्रमूक मध्ये पाचर!!

    Suvendu Adhikari : सुवेंदूंची घोषणा- ममता सरकारमधील भ्रष्टाचाराची चौकशी करणार; महिला छळाच्या प्रकरणांची चौकशी एचसीचे न्यायाधीश करतील