• Download App
    आंदोलनात सहभागी झालेल्या सांगली मधील वाहक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमूळे खळबळ | The Focus Indiaआंदोलनात सहभागी झालेल्या सांगली मधील वाहक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमूळे खळबळ | ST employees death in Sangli who participated in the agitation is raising anger

    आंदोलनात सहभागी झालेल्या सांगली मधील वाहक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमूळे खळबळ

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचार्यांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला दिवसेंदिवस भयानक रूप प्राप्त होत चालले आहे. आंदोलकांच्या तीन मागण्या मान्य केल्या असल्या तरी विलीनीकरणाच्या त्यांच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने एक विशेष समिती ची स्थापना केलेली आहे. या आंदोलनामुळे प्रवाशांची देखील बरीच गैरसोय होताना दिसून येत आहे.

    ST employees death in Sangli who participated in the agitation is raising anger

    एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्येमुळे या प्रकरणाला अतिशय भयानक रूप प्राप्त झाले आहे. आता आणखी एक बातमी समोर आली आहे. यानुसार सांगली जिह्यातील कवलापूर येथे राहणार्या राजेंद्र निवृत्ती पाटील वय वर्ष 46 यांचे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे.


    निजामशाहीमुळे ST कर्मचाऱ्यानं आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर याला ठाकरे सरकार जबाबदार राहील – आमदार गोपीचंद पडळकर


    सांगलीमधील कर्मचारयांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला होता. पहिल्या दिवसापासून पाटील यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. पण मागील तीन दिवसांपासून ते अांदाेलन मध्ये सहभागी होण्यास गेले नव्हते. लांबत चाललेल्या आंदोलनामुळे ते आपल्या नोकरी बाबत प्रचंड तणावाखाली होते. असे नातेवाईकांनी सांगितले आहे. आणि या ताणतणावामुळेच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

    एस टी कर्मचार्यांच्या आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर अशा बऱ्याच घटना समोर येण्याची शक्यता आहे. असे भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी यावेळी सांगितले आहे.

    ST employees death in Sangli who participated in the agitation is raising anger

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस