• Download App
    SSC- HSC : अखेर दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा झाल्या जाहीर | SSC-HSC: Finally the dates of 10th and 12th examinations have been announced

    SSC- HSC : अखेर दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा झाल्या जाहीर

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांच्या परीक्षांच्या तारखा अखेर समोर आलेल्या आहेत. बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये होणार आहे. ही लेखी परीक्षेची तारीख आहे. तसेच दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या काळामध्ये होणार आहे.

    SSC-HSC: Finally the dates of 10th and 12th examinations have been announced

    परीक्षेसंदर्भात माहिती देताना वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, ओमिक्रॉन संदर्भातील तपशिलाचा आम्ही वारंवार अभ्यास करत आहोत. दहावी आणि बारावी चे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असते, याची आम्हाला जाणीव आहे.


    Mhada Exam Update : म्हाडाची पूर्ण आठवड्यात होणारी परीक्षा पुढे ढकलली ;आता या महिन्यात होणार परिक्षा


    दहावीच्या मुलांची तोंडी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीमध्ये होणार आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चमध्ये होणार आहे.

    पुढे त्यांनी असे देखील सांगितले की, परीक्षा या नेहमीच्या पद्धतीनेच घेतल्या जातील. ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा होणार आहेत. परीक्षा पद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये.

    SSC-HSC: Finally the dates of 10th and 12th examinations have been announced

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस