• Download App
    सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राला राजस्थानात देशसेवा बजावताना वीरमरण , संभूखेडमध्ये होणार अंत्यसंस्कारson of Satara district will be cremated in Sambhukhed, Veermaran while performing national service in Rajasthan

    सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राला राजस्थानात देशसेवा बजावताना वीरमरण , संभूखेडमध्ये होणार अंत्यसंस्कार

    आज (शनिवार , २३ ऑक्टोबर ) संभूखेड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.संपूर्ण माण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.son of Satara district will be cremated in Sambhukhed, Veermaran while performing national service in Rajasthan


    विशेष प्रतिनिधी

    सातारा : संभूखेड गावचे (ता. माण) सुपुत्र जवान सचिन विश्वनाथ काटे (वय २४) यांचा राजस्थानमध्ये देशसेवा करताना मृत्यू झाला आहे. आज (शनिवार , २३ ऑक्टोबर ) संभूखेड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.संपूर्ण माण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    पोलिस स्टेशन हाऊस ऑफिसर परबत सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार , राजस्थानमधील बाडमेरजवळील जासई मिलिटरी कॅन्टोन्मेंट येथे सचिन काटे देशसेवा करत होते. २० ऑक्टोबर रोजी रात्री दहा ते मध्यरात्री ते प्रत्यक्ष कर्तव्य करत होते. पहाटे चार वाजता पुन्हा त्याची ड्यूटी होती; पण ते ड्यूटीवर न आल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध सुरू केला.



    शोध घेतला असता सचिन झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. जवानांनी तत्काळ सचिन यांना लष्करी रुग्णालयात नेले.दरम्यान तेथील डॉक्टरांनी सचिनला मृत घोषित केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, लष्करानेही तपासाचे आदेश दिले आहेत.

    सचिन काटे यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून दहिवडी कॉलेज येथे शिक्षण घेत असतानाच स्वराज ॲकॅडमी दहिवडी येथे सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण घेतले. अतिशय चपळ, एक ऊर्जावान तरुण, तसेच उत्कृष्ट क्रिकेटपटू, फुटबॉल, कबड्डी खेळाडू म्हणून त्यांची ओळख होती.

    २०१६ मध्ये ते सैन्यात भरती झाले होते. त्यानंतर त्यांचा भाऊही सैन्यात भरती झाला. गावी घराचे काम सुरू असून, त्यानंतर लग्न करण्याचे त्यांचे स्वप्न होते ; पण हे स्वप्न अपूर्णच राहिले. फक्त पाच वर्षांची देशसेवा झाली असतानाच यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

    son of Satara district will be cremated in Sambhukhed, Veermaran while performing national service in Rajasthan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस