• Download App
    बांगलादेशात दुर्गापूजा मंडपात कुराण ठेवलेल्या व्यक्तीला अखेर अटक |Contoversal person arrested in Bangaladesh

    बांगलादेशात दुर्गापूजा मंडपात कुराण ठेवलेल्या व्यक्तीला अखेर अटक

    विशेष प्रतिनिधी

    ढाका – बांगलादेशमध्ये हिंदू मंदिरे, नागरिक तसेच दुर्गापूजा मंडळांवर हल्ले होण्यास कारणीभूत ठरलेल्या घटनेतील मुख्य संशयित इक्बाल हुसेन याला बांगलादेश पोलिसांनी अखेर अटक केली.Contoversal person arrested in Bangaladesh

    कोमीला येथे जवळच्या मशिदीतून कुराणची प्रत आणून त्याने ती दुर्गापूजा मंडपात ठेवल्याचे सीसीटीव्ही फूटेजवरून स्पष्ट झाले आहे. दुर्गेच्या चरणांपाशी कुराणची प्रत ठेवण्यात आल्याची छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर बांगलादेशात अनेक ठिकाणी हिंदूंवर हल्ले झाले. पोलिसांनी ३५ वर्षीय इक्बालचे नाव याआधीच जाहीर केले होते.



    गुरुवारी रात्री कॉक्सबाजार समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात त्याला अटक करण्यात आली.हिंदूवरील हल्ल्यांचा संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) निषेध केला आहे. बांगलादेशमधील निवासी समन्वयक मिया सेप्पो यांनी सांगितले की, हे हल्ले बांगलादेशच्या राज्यघटनेतील मूल्यांच्या विरोधात आहेत. ते तातडीने थांबविले जाण्याची गरज आहे.

    Contoversal person arrested in Bangaladesh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    American : इराणला अणू अप्रसार कराराचा उपाध्यक्ष बनवण्यावरून वाद:अमेरिकन अधिकारी म्हणाले- हा संघटनेचा अपमान

    Israel Politics : इस्रायलमध्ये नेतन्याहूंना हटवण्यासाठी एकवटले दोन माजी PM; बेनेट-लॅपिड आपल्या पक्षांचे विलीनीकरण करतील

    India-New Zealand : भारत-न्यूझीलंडदरम्यान मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी; आता सर्व निर्यातीवर शुल्क शून्य झाले, 5000 भारतीयांना वर्किंग व्हिसा