Supreme Court : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर इतरांना बदनाम करण्यासाठी करता येत नाही. भाषेवर संयम ठेवला पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील महाविद्यालयातील शिक्षकास अटक होण्यापासून संरक्षण नाकारताना सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली. Social Media Platforms Cannot Be Used To Defame Others says Supreme Court in Smruti irani Defame case
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर इतरांना बदनाम करण्यासाठी करता येत नाही. भाषेवर संयम ठेवला पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील महाविद्यालयातील शिक्षकास अटक होण्यापासून संरक्षण नाकारताना सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली.
या शिक्षकावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरुद्ध फेसबुकवर आक्षेपार्ह भाष्य केल्याचा आरोप आहे. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने म्हटले की, सोशल मीडियावर कोणत्याही व्यक्तीवर टीका किंवा विनोद करताना लोकांनी त्यांच्या भाषेची काळजी घेतली पाहिजे.
यूपीच्या फिरोजाबादच्या एसआरके महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख प्रोफेसर शहरयार अली यांची अटकपूर्व जामीन याचिका खंडपीठाने फेटाळताना म्हटले आहे की, तुम्ही महिलांना अशा प्रकारे बदनाम करू शकत नाही. आपण केवळ बदनामी करण्यासाठी सोशल मीडिया वापरू शकत नाही. कोणती भाषा वापरली जात आहे? टीका करण्याची किंवा उपहास करण्याचीही एक भाषा आहे. आपण काहीही बोलू शकत नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणानुसार पोलिसांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात शहरयार अलीने अश्लील फेसबुक फीड पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. भाजप नेत्याच्या तक्रारीवरून प्राध्यापकावर भारतीय दंड संहिता आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Social Media Platforms Cannot Be Used To Defame Others says Supreme Court in Smruti irani Defame case
महत्त्वाच्या बातम्या
- Phone Tapping : नाना पटोलेंच्या आरोपांना अजित पवारांचे समर्थन, म्हणाले- पटोलेंचे आरोप निराधार नाहीत!
- स्वदेशी कोव्हॅक्सिनला लवकरच मिळू शकते WHOची मंजुरी, चीफ साइंटिस्ट म्हणाल्या – लसीची एफिशिएन्सी खूप जास्त
- कोरोनाचे कप्पा स्वरूप ‘व्हेरियंट ऑफ कन्सर्न’ नाही, तर ‘व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट’ आहे – केंद्रीय आरोग्य मंत्रालय
- Milk Price Hike : अमूलनंतर आता मदर डेअरीनेही वाढवले दुधाचे दर, दोन रुपये प्रति लिटर महाग
- Gokul Milk Price : गोकुळ दुधाच्या दरात वाढ, 11 जुलैपासून लागू होणार नवे दर