• Download App
    निधी वाटपात अन्याय करणाऱ्या राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनेत "धूर"; संजय राऊतांच्या मात्र केंद्रीय तपास संस्थांविरोधात "तोफा"!! । "Smoke" in Shiv Sena against NCP which is unfair in allocating funds; Sanjay Raut's "gun" against the Central Investigation Agency !!

    निधी वाटपात अन्याय करणाऱ्या राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनेत “धूर”; संजय राऊतांच्या मात्र केंद्रीय तपास संस्थांविरोधात “तोफा”!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : एकीकडे महाराष्ट्रातल्या आमदार निधी वाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेनेत मोठा धूर निघतो आहे, तर दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत मात्र केंद्रीय तपास संस्था विरोधात तोफा डागत आहेत. “Smoke” in Shiv Sena against NCP which is unfair in allocating funds; Sanjay Raut’s “gun” against the Central Investigation Agency !!

    शिवसेनेच्या 25 ते 30 आमदारांनी गेली अडीच वर्षे दबून राहिलेला आपला असंतोष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे बोलून दाखवला आहे. आमदार निधी वाटपात महाविकास आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना झुकते माप देतात. शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय करतात अशा थेट तक्रारी शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून केल्या आहेत. निधी वाटपातला अन्याय दूर झाला नाही तर अर्थसंकल्प सादर होण्याच्या वेळी विधिमंडळात उपस्थित राहायचे की नाही याचा विचार करू असा इशारा देण्याइतपत शिवसेना आमदारांच्या असंतोषाचा कडेलोट झाला आहे.



    एकीकडे शिवसेना आमदारांच्या असंतोषाचा असा कडेलोट झाला असताना दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे केंद्रीय तपास संस्थांवर तोफा डागत आहेत. त्यात दुपारी चार वाजता शिवसेना भवनात प्रेस कॉन्फरन्स घेऊ पंतप्रधानांना लिहिलेले 13 पानी पत्र पत्रकारांसमोर ठेवणार आहेत. या 13 पानी पत्रात केंद्रीय तपास संस्थांमधले अधिकारी किती भ्रष्ट आहेत याचे पुरावे असल्याचा संजय राऊत यांचा दावा आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या तक्रारी योग्य असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितले असले तरी प्रत्यक्षात त्यावर नेमक्या उपाययोजना शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय करणार याबद्दल मात्र त्यांनी काहीही सांगितले दिसत नाही.

    “Smoke” in Shiv Sena against NCP which is unfair in allocating funds; Sanjay Raut’s “gun” against the Central Investigation Agency !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस