• Download App
    सिल्वर ओक वर चप्पल फेक : सुप्रिया सुळे शाहरुख खानच्या मुलाचा आई बनल्या, पण एसटी कर्मचाऱ्यांच्या बहीण नाही बनल्या; महिलांचा आक्रोश!!|Slipper throw on Silver Oak: Supriya Sule became the mother of Shah Rukh Khan's son, but not the sister of ST employees; Women's outcry

    सिल्वर ओक वर चप्पल फेक : सुप्रिया सुळे शाहरुख खानच्या मुलाचा आई बनल्या, पण एसटी कर्मचाऱ्यांच्या बहीण नाही बनल्या; महिलांचा आक्रोश!!

    प्रतिनिधी

    मुंबई : संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी आज शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओक वर धडक आंदोलन करून दगडफेक आणि चप्पल फेक केली. यावर संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय गदारोळ उठला असून एसटी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या आणि त्यांचा आक्रोश यापेक्षा शिवसेना – राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आणि त्यावर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया यांच्या बातम्या देण्यावरच मराठी माध्यमे भर देताना दिसत आहेत.Slipper throw on Silver Oak: Supriya Sule became the mother of Shah Rukh Khan’s son, but not the sister of ST employees; Women’s outcry

    परंतु, एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्वर ओकपाशी आंदोलन करताना शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. सुप्रिया सुळे या शाहरुख खानच्या मुलाच्या आई बनल्या. पण एसटी कर्मचाऱ्यांच्या आई – बहीण बनल्या नाहीत. गेले पाच महिने शरद पवारांनी आमच्याकडे मान वळवून बघितले नाही. आमचे हाल आमचे आणि आमच्या कुटुंबाचे लहान लेकरांचे हाल चालले आहेत त्याकडे त्यांचे लक्ष नाही, असे आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी विविध प्रसार माध्यमांच्या समोर केले. शरद पवारांच्या विरोधात त्यांनी “चोर सम्राट” अशी जोरदार घोषणाबाजी केली.



    एसटी कर्मचाऱ्यांचा संताप प्रचंड अनावर झाला होता. सुप्रिया सुळे यांनी सिल्वर ओक बाहेर येऊन सर्व कर्मचाऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मी शांतपणे चर्चा करायला तयार आहे. आत्ता आपण लगेच चर्चा करू, असे त्या म्हणत होत्या. परंतु संतप्त एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या भावना आवरल्या नाहीत. त्यांनी शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी सुप्रिया सुळे यांना त्यांच्या भोवती कडे करत त्यांना एसटी कर्मचाऱ्यांना पासून अलग करण्यात यश मिळवले.

    घरात आई-वडील आणि माझी मुलगी आहे. त्यांच्या सुरक्षिततेची मला काळजी वाटते. मी त्यांना पाहून पुन्हा तुमच्याशी बोलायला येते, असे त्यांनी हात जोडून एसटी कर्मचाऱ्यांना सांगितले आणि त्या सिल्वर ओक मध्ये निघून गेल्या. दरम्यानच्या काळात पोलिस उपायुक्त विश्वास नांगरे-पाटील तेथे पोहोचले होते. पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांना सिल्वर ओक परिसरातून हलवून आझाद मैदानात पोहोचवले.

    त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते सिल्वर ओक परिसरात जमून घोषणाबाजी करत होते. या घोषणाबाजीतच सुप्रिया सुळे यांनी आपण एसटी कर्मचाऱ्यांची शांततेच्या करायला तयार होतो, असे पत्रकारांना सांगितले.

    शिवसेना – राष्ट्रवादी विरुद्ध भाजप

    या सर्व प्रकाराला याच वेळी राजकीय वळण मिळून सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप विरुद्ध प्रचंड आगपाखड केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संतापासाठी आणि आंदोलनासाठी भाजपचेच अदृश्य हात जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते आणि मावळते खासदार संजय राऊत यांनी केला.

    त्याची री राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओढली. तसेच या प्रकरणात दोषी असलेल्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करू, असे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. शरद पवार यांच्या सिल्वर ओक जवळ अचानक झालेले आंदोलन पाहता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी भोवतीचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

    Slipper throw on Silver Oak: Supriya Sule became the mother of Shah Rukh Khan’s son, but not the sister of ST employees; Women’s outcry

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस