• Download App
    सिंधुताई यांच्या पार्थिवावर महानुभव पंथाप्रमाणे दफनविधी करण्यात आलेSindhutai's body was buried according to Mahanubhav sect

    सिंधुताई यांच्या पार्थिवावर महानुभव पंथाप्रमाणे दफनविधी करण्यात आले

    सिंधुताई सपकाळ यांचे पार्थिव आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मांजरी बुद्रुक येथील सन्मती बालनिकेतन येथे आणण्यात आले.Sindhutai’s body was buried according to Mahanubhav sect


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी (ता.४) रात्री ८ वाजून १० मिनीटांनी ह्रदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले.वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. सिंधूताईंची मुलगी ममता सपकाळ यांच्यासह त्यांच्या नेहमी सोबत असणाऱ्या नातलगांनी रुग्णालयाच्या बाहेर हंबरडा फोडला.



    सिंधुताई सपकाळ यांचे पार्थिव आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मांजरी बुद्रुक येथील सन्मती बालनिकेतन येथे आणण्यात आले. त्यावेळी नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.दरम्यान पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांना शासकीय इतमामात सलामी देण्यात आली. तसेच सिंधुताई यांच्या पार्थिवावर महानुभव पंथाप्रमाणे दफनविधी करण्यात आले. पुण्यातील ठोसर पागा इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

    Sindhutai’s body was buried according to Mahanubhav sect

    Related posts

    Kalyan West : कल्याणमध्ये 5 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; मलब्याचा ढीग थेट रस्त्यावर, जीव मुठीत धरून नागरिक खिडकीतून पळाले

    MSRTC Ashadhi Wari : वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाची मोठी घोषणा; 40 भाविक एकत्र आल्यास थेट घरापासून मिळणार विशेष बस; परिवहन मंत्र्यांची माहिती

    Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस केंद्रीय स्तरासाठी योग्य नेतृत्व; 2029 पूर्वी त्यांनी पंतप्रधान व्हावे, संजय राऊत यांचे वक्तव्य