• Download App
    राजकीय भूकंप : शिवसेनेचे ‘हे’ आमदार आहेत "नॉट रिचेबल" वाचा नावे!!|Shivsena splits : 13 MLAs are with minister eknath shinde

    राजकीय भूकंप : शिवसेनेचे ‘हे’ आमदार आहेत “नॉट रिचेबल” वाचा नावे!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात राजकारणात मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेनेचे सर्वात वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ११ ते १२ आमदार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर रातोरात नॉटरिचेबल आहेत. नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे हे गुजरातच्या सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.Shivsena splits : 13 MLAs are with minister eknath shinde



     शिवसेनेचे ‘हे’ आमदार नॉट रिचेबल!!

    1. संजय गायकवाड – मेहकर
    2. संजय रायमुलकर – बुलढाणा
    3. महेश शिंदे – सातारा
    4. शहाजी पाटील – सांगोला, सोलापूर
    5. प्रकाश अबिटकर – राधानगरी, कोल्हापूर
    6. संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ
    7. ज्ञानराज चौगुले – उमरगा, उस्मानाबाद
    8. तानाजी सावंत – परांडा, उस्मानाबाद
    9. अब्दुल सतार – सिल्लोड, औरंगाबाद
    10. संदिपान भूमरे – पैठण, औरंगाबाद
    11. संजय शिससाट – औरंगाबाद पश्चिम
    12. रमेश बोरनारे – वैजापूर, औरंगाबाद
    13. नितीन देशमुख – बाळापूर
    14. उदयसिंग राजपूत – कन्नड

    एकनाथ शिंदेंसह 13 आमदार शिवसेनेवर नाराज

    असेही सांगितले जात आहे की, सोमवारी रात्री एकनाथ शिंदेंसह 13 आमदार सूरतच्या या हॉटेलमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी गुजरातच्या एका वरिष्ठ नेत्यासह गुप्त बैठकही केली. तसेच, या हॉटेल बाहेर सुरक्षा पोलीस तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह हे सर्व आमदार शिवसेनेवर नाराज आहेत. त्यामुळे ते नॉट रिचेबल होऊन थेट गुजरातला दाखल झाले आहे.  दरम्यान, या हॉटेलमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची चौकशी केली जात आहे.

    आजच्या बैठकीला शिंदे उपस्थित राहणार की नाही

    शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माघारी मतदारसंघात निघालेल्या आमदारांना पुन्हा मुंबईत बोलावले आहे. शिवसेनेतर्फे तातडीने मंगळवारी एक बैठक बोलवण्यात आली आहे. मात्र, विधान परिषद निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा गट नाराज असून शिंदे यांच्यासह या सर्व आमदारांचे कालपासून फोन नॉट रिचेबल आहे. ते गुजरातमध्ये असल्याने आजच्या बैठकीला शिंदे उपस्थित राहणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

    Shivsena splits : 13 MLAs are with minister eknath shinde

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस