• Download App
    राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहितेंचा माज शिवसेना उतरवेल; खासदार संजय राऊतांचा इशारा shivsena MP sanjay raut warns NCP MLA dilip mohite dire consiqunces

    राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहितेंचा माज शिवसेना उतरवेल; खासदार संजय राऊतांचा इशारा

    प्रतिनिधी

    राजगुरूनगर – खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यामुळेच तालुक्यात महाविकास आघाडीत वाद निर्माण झाला आहे. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार खेडमध्ये आलो आहोत. पण आमदार दिलीप मोहिते यांचा बंदोबस्त पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी करावा, नाही तर शिवसेनेकडे हा विषय सोपवावा, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज राजगुरूनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला. shivsena MP sanjay raut warns NCP MLA dilip mohite dire consiqunces



    संजय राऊत म्हणाले, की दिलीप मोहिते हे शरद पवारांच्या पक्षात राजकारण करण्यासाठी लायक नाहीत. पंचायत समितीच्या जागेवरून आमदार राजकारण करत आहेत, ते परंपरेला धरून नाही. अजितदादांनी सांगूनसुद्धा हे रेटून नेत असतील तर ह्याला सत्तेचा माज आला आहे, असेच म्हणावे लागेल. पंचायत समितीच्या सदस्यांना पळवून नेले, दहशतीने पळवून नेले. त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत हा विषय नेला जाईल; पण हे राजकारण घाणेरडे आहे. पंचायत समिचीचा विषय आमच्यासाठी संपला. शिवसेनेने बांगड्या घातलेल्या नाही. आम्हीही माणसे फोडू शकतो. पण आम्ही नियमांनी बांधल्यामुळे आम्ही तसे काम करणार नाही.

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आमची शरद पवारांवरही श्रद्धा आहे.

    आम्ही त्यांच्यापर्यंत आधी जाऊ, त्यानंतर आम्ही काय करायचे हे आम्ही पाहू. दिलीप मोहिते यांची वागणूक अशीच असेल तर महाविकास आघाडी असो की नसो, इथे शिवसेनेचा उमेदवार असेल आणि आताचे दिलीप मोहिते हे माजी आमदार होईल. आमच्या स्वाभिमानाचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही काय करू शकतो हे दाखवून देऊ. त्यांना पाडून शिवसेनेचा आमदार निवडून येईल, हा इशारा त्यांच्यासाठी आहे ज्यांनी शिवसेनेच्या वाघाच्या शेपटावर पाय ठेवलाय, अशा शब्दांत संजय राऊत यांनी दिलीप मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला.

    shivsena MP sanjay raut warns NCP MLA dilip mohite dire consiqunces

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस