प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा ताबा एकनाथ शिंदेंकडे दिल्यानंतर पक्षाचे मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनावर हक्क कुणाचा??, असा सवाल उपस्थित होतो आहे, खरा. पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यावर हक्क सांगायचा नाही, असे ठरविले आहे.Shivsena bhavan originally belonged to shivai trust, but now it’s belonges to Uddhav Thackeray only, documents claimed
पण शिवाई सेवा ट्रस्टच्या जागेवर ही वास्तू उभी असल्याने तिच्यावर कुणीही हक्क सांगू शकत नाही, असा सर्वसामान्य शिवसैनिकांचा सूर आहे. मात्र, सध्या शिवाई सेवा ट्रस्ट केवळ नावापुरती असून, शिवसेना भवनावर उद्धव ठाकरेंची मालकी असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर सर्व्हे रजिस्टर ऑफ मुंबई सिटीचे डॉक्युमेंट टाकून शिवसेना भवनाच्या मालकीचा लेखाजोखाच सादर केला आहे.
शिवसेना भवन उभे असलेल्या जागेची मूळ मालकी बाई हाजीनी झुलेखबाई सुलेमान यांच्याकडे होती. भाडेपट्ट्यावरील ही जमीन भाडेकरारावर बाई फजिलाबाई आणि ताहेरबाई ए गुलमोहम्मद यांच्याकडून शिवाई सेवा ट्रस्टने घेतली. सुरुवातीला शिवसेनेचे पहिले महापौर हेमचंद्र गुप्ते, मीनाताई ठाकरे, वामन महाडिक, माधव देशपांडे, सुधीर जोशी, लिलाधर डाके, शाम जयंत देशमुख, कुसुम शिर्के, भालचंद्र देसाई हे या ट्रस्टचे विश्वस्त होते. शिवाई ट्रस्टची आणि त्यांच्या विश्वस्तांची नोंद या जागेच्या मालमत्ता पत्रकावर करण्यात आली होती.
यातील देशमुख, शिर्के आणि देसाई यांनी राजीनामा दिला, तर गुप्ते, मीनाताई ठाकरे, वामन महाडिक यांचे निधन झाले. त्यानंतर रवींद्र मिर्लेकर, अरविंद सावंत, विशाखा राऊत, सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांची विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, २०२१ मध्ये अचानक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मालमत्ता पत्रकावर चढवत, आजीवन विश्वस्त म्हणून धर्मादाय आयुक्तांच्या नोंदणी कार्यालयातील दस्तावेजात त्यांचे नाव जोडण्यात आले. त्यामुळे शिवाई ट्रस्टमधील इतर सदस्य केवळ नावापुरते असून, शिवसेना भवनाचा ताबा (मालकी) हा उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याचे कागदोपत्री स्पष्ट होत आहे.
‘त्या’ नेत्यांना कुणी बाजुला केले?
शिवसेना भवन हे शिवाई ट्रस्टच्या माध्यमातून उभारले गेले असले, तरी बाळासाहेबांनी नेमलेल्या अनेक नेत्यांना या ट्रस्टमधून बाजूला करण्यात आले आहे. बाळासाहेबांनी हयातीत स्वतःचे नाव शिवाई ट्रस्ट वा शिवसेना भवनाशी संबंधित एकाही कागदपत्रावर चढवले नाही. नेहमी कार्यकर्त्यांना संधी दिली. मात्र, त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी स्वतःला आजीव विश्वस्तपदी नेमून इतरांवर अविश्वास दाखवल्याची टीका शिवसैनिकच करीत आहेत. या संदर्भात ठाकरे गटाकडून अद्याप कोणता खुलासा झालेला नाही.
Shivsena bhavan originally belonged to shivai trust, but now it’s belonges to Uddhav Thackeray only, documents claimed
महत्वाच्या बातम्या
- “राष्ट्रीय” नेते शरद पवार कसबा – चिंचवडच्या पोटनिवडणूक प्रचारात!!; त्यांचे राष्ट्रीय ते स्थानिक नेहमीच फ्लिप – फ्लॉप!!
- राष्ट्रपती राजवट उठवण्याचे “रहस्य” सांगितले, पण मूळात ती लावलीच का?, याचेही “रहस्य” सांगून टाका!!; फडणवीसांचे शरद पवारांना आव्हान
- ठाकरे गटाची याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली; मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगितीस नकार
- समझनेवालों को इशारा काफी; शरद पवारांनीच घातली होती भाजपला टोपी!!