प्रतिनिधी
मुंबई – शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी – जानव्यातले नाही, असे म्हणणाऱ्या शिवसेनेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे शुध्दीकरण गोमुत्राने केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजपासून मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करताना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन दर्शन घेतले. Shivsainiks purified Balasaheb Thackeray`s memorial with cow urine
त्यामुळे स्मृतीस्थळ अपवित्र झाले अशा भावनेतून स्मृतीस्थळाचे शुद्धीरकरण करण्यात आले. नारायण राणे हे बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन नारायण निघून गेल्यानंतर तिथे शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाचं दुधानं शुद्धीकरण केले.
बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे केअर टेकर आप्पा पाटील यांनी स्मृतीस्थळावर आधी दुग्धाभिषेक, त्यानंतर गोमूत्राने त्या जागेचे शुद्धीकरण केले. तिथे बाळासाहेबांना आवडणारी चाफ्याची फुले वाहण्यात आली. आप्पा पाटील यांच्यासोबत काही शिवसैनिक हजर होते.
अप्पा पाटील म्हणाले की, सकाळी मी आलो होतो. पण पोलिसांनी मला आतमध्ये येऊ दिले नव्हते. पण माझे रक्त मला शांत बसू देत नव्हते. कुठेतरी ही वास्तू पवित्र होणे गरजेचे होते. मग बाळासाहेबांच्या वास्तूला दुग्धाभिषेक करून ती पवित्र करण्याचा माझा प्रयत्न केला.
भाजपचे नेते आमदार आशिश शेलार यांनी या तथाकथिक शुध्दीकरणावरून टीकास्त्र सोडले आहे. आता शिवसेनेचच शुध्दीकरण करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. सोशल मीडियातूनही यावर टीका – प्रतिटीका सुरू झाल्या आहेत.
शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी – जानव्यात नाही असे म्हणणाऱ्या शिवसेनेचे हिंदुत्व गोमुत्रात आहे का, असा खडा सवाल काही नेटिझन्सनी विचारला आहे.
Shivsainiks purified Balasaheb Thackeray`s memorial with cow urine
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : ठाकरे सरकार अनिल देशमुखांना ईडीच्या ताब्यात देण्याऐवजी लपवण्यात मश्गुल, किरीट सोमय्यांचा आरोप
- Bengal Post Poll Violence : ममतांच्या छत्रछायेखाली झालेल्या हिंसाचाराचा तपास सीबीआय करणार
- पुण्यातील नरेंद्र मोदी मंदिरातून पुतळा हटवला, थेट पंतप्रधानांच्या कार्यालयातून आला होता फोन
- शब्दबंदी : दोन राज्ये दोन निर्णय…!! एक राजकीय, दुसरा धर्मभावनेतून…!!
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधूच्या कोचला अयोध्येला येण्याचे निमंत्रण का दिले…?? वाचा…