• Download App
    शिवसेनाठाकरेंची की शिंदेंची??; 5 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे गुरुवारी सुनावणी!!; महाराष्ट्रातली 1986 पासूनची तिसरी केस!!|Shiv Thakar or Shinde??; Hearing before 5 Judges Constitution Bench on Thursday!!; Third case in Maharashtra since 1986!

    शिवसेना : ठाकरेंची की शिंदेंची??; 5 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे गुरुवारी सुनावणी!!; महाराष्ट्रातली 1986 पासूनची तिसरी केस!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : शिवसेना खरी कोणाची??, शिंदेंची का ठाकरेंची??, या विषयावरचा निर्णय आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टाने अखेर घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. घटनापीठापुढील या सुनावणीच्या आधी शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण या विषयावर निवडणूक आयोगाने निर्णय घेऊ नये, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.Shiv Thakar or Shinde??; Hearing before 5 Judges Constitution Bench on Thursday!!; Third case in Maharashtra since 1986!

    सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठापुढे शिवसेनेच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. त्याची पहिली सुनावणी गुरुवारी म्हणजे 25 ऑगस्ट रोजी होणार आहे.



    – महाराष्ट्राची तिसरी केस घटनापीठापुढे

    नजीकच्या इतिहासातली घटनापीठा पुढे गेलेली महाराष्ट्राची ही तिसरी केस आहे. महाराष्ट्र सरकार विरुद्ध दाऊदी बोहरा कम्युनिटी यांची केस घटनापीठाकडे 1986 पासून पेंडिंग आहे. त्यानंतर महाराष्ट्र प्रॉपर्टी असोसिएशन विरुद्ध महाराष्ट्र सरकार ही केस 1991 पासून घटनापीठापुढे पेंडिंग आहे. त्यानंतर आज 23 ऑगस्ट 2022 रोजी शिवसेनेच्या दोन गटांमधील संघर्ष आणि पर्यायाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनापीठापुढे पोहोचला आहे. याच केशरी सुनावणी गुरुवारी 25 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे.

    – घटनापीठाची संरचना

    घटनापीठाची संरचना सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश न्यायाधीशांच्या सेवाजेष्ठतेनुसार आणि घटनेच्या अभ्यासानुसार करत असतात. 5 पासून 9 पर्यंत एवढ्या आकड्यात घटनापीठावरील न्यायाधीशांची संख्या असू शकते. वरिष्ठ न्यायाधीशांची चर्चा करून घटनापीठ नेमण्याचा अधिकार स्वरन्यायाधीशांचा असतो त्यानुसार 5 सरन्यायाधीशांच्या खंडपीठाकडे घटनापीठाकडे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी घेण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे.

    Shiv Thakar or Shinde??; Hearing before 5 Judges Constitution Bench on Thursday!!; Third case in Maharashtra since 1986!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ