शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात पर पडला.यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी महत्वाची घोषणा केली आहे.Shiv Sena’s Dussehra rally! Important announcements made by Uddhav Thackeray for Mumbaikars at the meet
विशेष प्रतिनिधी
मुंबई : संपूर्ण भारतात काल (15 ऑक्टोबर ) विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात पर पडला.यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी महत्वाची घोषणा केली आहे.
मुंबईत मराठी भाषा भवन करण्याचा महाविकास आघाडीचे ध्येय असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.दरम्यान या मराठी भाषा भवनासाठी दिवाकर रावते यांनी मागील सरकारमध्ये पाठपुरावा केला होता.परंतु आता मराठीचा संस्कार सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठी भाषा भवनाचे काम लवकरच मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच मराठी रंगभूमी दालन वरळी येथे लवकरच उभारणार आहेत. जागतिक दर्जाचं आर्थिक केंद्र धारावीत करणार असून धारावीच्या लोकांचे पुनर्वसन करणार असल्याची मोठी घोषणा ठाकरे यांनी केली आहे.
लढाई न बघितल्याने काही जणांना स्वातंत्र्याची किंमत कळत नाही. सैनिक प्रतिकूल परिस्थितीत तैनात असतात. देशाची सेवा करतात. त्यांची परिस्थिती कळली पाहिजे.त्यामुळेलष्कराचं संग्रहालय बांधणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.हा दसरा मेळावा मुंबईकरांसठी महत्वपूर्ण ठरला आहे.
Shiv Sena’s Dussehra rally! Important announcements made by Uddhav Thackeray for Mumbaikars at the meet
महत्त्वाच्या बातम्या
- Cruise Drugs Case : आर्यन खान बनला कैदी नंबर 956, खान कुटुंबाने मनी ऑर्डरने तुरुंगात पाठवले 4500 रुपये
- पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला समर्पित केल्या 7 नवीन संरक्षण कंपन्या, म्हणाले- ’15-20 वर्षांपासून प्रलंबित होते हे काम!’
- Inflation : खाद्यतेलांवरील आयात शुल्क रद्द केल्यानंतर केंद्राचे 8 राज्यांना पत्र, महागाई नियंत्रित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहन
- मंदिर-मंडपांवर हल्ल्यातील सहभागींना सोडले जाणार नाही, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे प्रतिपादन
- Elgaar Parishad case : वरवरा राव यांना 28 ऑक्टोबरपर्यंत सरेंडर करण्याची गरज नाही – मुंबई उच्च न्यायालय