विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना देशभर लोकसभेची निवडणूक लढवेल, अशी घोषणा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. Shiv Sena will contest Lok Sabha elections across the country under the leadership of Aditya Thackeray; Announcement by Sanjay Raut
गोव्याच्या दोन दिवसांच्या प्रचार दौऱ्यातून आदित्य ठाकरे नुकतेच परत आले आहेत. गोव्यात त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आता शिवसेना देशपातळीवर झेप घेण्याच्या तयारीत असून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक देशभर लढविण्याची संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. शिवसेना देशभरात 100 जागी उमेदवार उभे करेल आणि भाजपशी टक्कर घेईल, असेही त्यांनी सांगितले. आदित्य ठाकरे निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करतील लवकरच ते लखनऊचा दौरा करतील, असे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असा दावाही संजय राऊत यांनी केला.
आदित्य ठाकरे यांच्या देशव्यापी नेतृत्वाची घोषणा संजय राऊत यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व अद्याप महाराष्ट्रात स्थिर व्हायचे आहे. युवा सेनेचे नेतृत्व अशी त्यांची पहिली ओळख आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये पर्यावरण आणि पर्यटन मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारून आदित्य ठाकरे यांना दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या नेतृत्वाखाली देशभर लोकसभेची निवडणूक लढवणे याचा नेमका अर्थ काय?, या विषयी राजकीय वर्तुळात खल सुरू झाला आहे. त्याच बरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीविषयी देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे संपूर्ण शिवसेनेचे नेतृत्व सोपविण्याचा दृष्टीने उद्धव ठाकरे वेगाने पावले टाकत असल्याचे यातून दिसत आहे.
– तेजस ठाकरे यांच्या नेतृत्वाची पुन्हा चर्चा!!
मध्यंतरी तेजस ठाकरे यांच्याकडे युवा सेनेचे नेतृत्व सोपवून आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे नेतृत्व देण्याचे पक्षाच्या वर्तुळात घाटात असल्याचे बोलले जात होते. परंतु, दरम्यानच्या काळात तेजस ठाकरे यांच्या युवा सेनेच्या नेतृत्वाच्या चर्चा थंडावल्या होत्या. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा झाल्यानंतर आता तेजस ठाकरे यांच्या नेतृत्वाची देखील चर्चा पुन्हा सुरू होणार आहे.
Shiv Sena will contest Lok Sabha elections across the country under the leadership of Aditya Thackeray; Announcement by Sanjay Raut
महत्त्वाच्या बातम्या
- गोव्याच्या राजकारणात खंजीराचा खणखणाट; पण पवारांचा नव्हे, मग कोणाचा??
- दिल्ली – लंडन बससेवेला लवकरच सुरुवात, भाडे १५ लाख; तब्बल ७० दिवसांचा प्रवास
- तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात? नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट; मृतांचा आकडाही घटला
- मनरेगाच्या कामाचा योग्य दाम कसा मिळेल यावर चर्चा ; किसान सभा, श्रमिक व प्रशासन यांची विशेष बैठक