• Download App
    अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 35 % च्या आतला विजय Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party's victory in Andheri by-election within 35%

    अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 35 % च्या आतला विजय

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा अपेक्षेबरहुकुम विजय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या शक्तीची लिटमस टेस्ट असे माध्यमांनी वर्णन केलेली पोटनिवडणूक ठाकरे गटाने जिंकल्याने त्या गटापेक्षा माध्यमांमध्येच आनंदाचे वातावरण आहे. Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party’s victory in Andheri by-election within 35%

    मतमोजणीच्या तेराव्या फेरी अखेर ऋतुजा लटकेंना 48000 पेक्षा जास्त मते मिळाली आहेत, तर नोटाला 9500 पेक्षा जास्त मते मिळाली आहेत. ऋतुजा लटके यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे.

    ठाकरे गटाने पोटनिवडणुकीत कसा हिरीरीने प्रचार केला, त्याचा लाभ ऋतुजा लटकेंना कसा मिळाला, सहानुभूतीची लाट कशी वर्क झाली, वगैरे रसभरीत वर्णने माध्यमांनी केली आहेत. पण मुदलातच हा विजय 35 % आतमधला आहे. कारण अंधेरी पोट निवडणुकीत एकूण मतदानच फक्त 31.74% झाले होते. या मतदारसंघातील एकूण 2 लाख 7502 मतदारांपैकी फक्त 84 हजार 566 मतदारांनी मतदान केले होते. देशभरात 3 नोव्हेंबर 2022 रोजी विविध लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात झालेल्या झालेल्या पोटनिवडणुकीत अंधेरीतले मतदान सर्वात कमी होते. त्यामुळे माध्यमांनी वर्णन केलेली शक्तिपरीक्षेची लिटमस टेस्ट मूळातच 35 % च्या आतली होती.



    त्यातही महाराष्ट्रातल्या राजकीय घराण्यांच्या परंपरेनुसार कोणत्याही लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यानंतर त्या लोकप्रतिनिधींच्या घरातलाच उमेदवार उभा असेल, तर विरोधी पक्ष उमेदवार देत नाहीत. त्यामुळे भाजपने मुरजी पटेल यांना अंधेरीतून आधी उमेदवारी जाहीर करून नंतर माघार घ्यायला लावली होती. म्हणजे भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीतील राजकीय चुरस संपवली होती.

    त्यातच माध्यमांनी त्यांच्या सोर्सेसच्या हवाल्यातून अंधेरीत नोटा मतदानाचा प्रचार सुरू आहे, अशा बातम्या दिल्या होत्या. याचा अर्थ शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा नोटाला जास्त मते पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असा दावा माध्यमांनी बातम्यांमधून केला होता. परंतु ऋतुजा लटकेंना मिळालेली मते लक्षात घेता माध्यमांचा तो दावाही फोल ठरला आहे.

    पण एकूण माध्यमांनीच जास्त रंगवलेली, भाजपने माघार घेऊन चुरस संपवलेली आणि त्यातही एकूण मतदानात 35 % च्या आतमध्ये झालेली पोटनिवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिंकली आहे.

    Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party’s victory in Andheri by-election within 35%

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!