विशेष प्रतिनिधी
रायगड : शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते अनंत गीते बऱ्याच दिवसांनी बोलले. पण त्यांनी तडाखेबंद भाषण करून राजकीय बाँम्बगोळाच टाकला आहे. महाराष्ट्रात आपले सरकार आहे आणि आपले तरी कशासाठी म्हणायचे तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. शिवसेनेचे कधीच काँग्रेसशी जुळणार नाही आणि दोन्ही काँग्रेस या कधीच एकत्र येणार नाही. कारण मूळात राष्ट्रवादीचा जन्म हा काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, असे खळबळजनक वक्तव्य अनंत गीते यांनी केले आहे. shiv sena leader anant gite targets congress – NCP in shrivardhan
श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच शिवसेनेत पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी अनंत गीते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना गीते यांनी सध्याच्या ठाकरे – पवार सरकारविषयी परखड मते मांडली. ते म्हणाले, की राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. कोणीही कुठलाही नेता जगाने त्याला कितीही उपाध्या देवो, जाणता राजा बोलो. तो आमचा गुरु होऊ शकत नाही. आमचा गुरु फक्त बाळासाहेब ठाकरेच…!!
महाविकास आघाडीचे नेते आघाडी सांभाळतील आपल्याला ग्रामपचांयत, पचांयत समिती, जिल्हा परिषद सांभाळायची आहे. उद्या आघाडी तुटलीच, तर आपण सुनील तटकरेंकडे जायचे का… आपण आपल्याच घरी येणार. म्हणून आपल्याला आपला पक्ष बळकट करायचा आहे, आघाडी नाही, असे रोखठोक वक्तव्य अनंत गीते यांनी केले.
दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही!
मी शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. दोन्ही काँग्रेस या कधी एकमेकांची तोंडे बघत नव्हत्या. त्यांची विचारांची सांगड बसत नव्हती. एक मत नव्हते, दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाहीत, तर शिवसेना आणि काँग्रेस एक विचाराची कदापी होऊ शकणार नाही. ते दोन एक होऊ शकत नाहीत. मूळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, तर आम्ही शिवसैनिक त्यांच्या विचाराचे होणे कदापी शक्य नाही, असे अनंत गीते म्हणाले.
shiv sena leader anant gite targets congress – NCP in shrivardhan
महत्त्वाच्या बातम्या
- Pornographic Case : पॉर्नोग्राफी केसमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला जामीन, 19 जुलैपासून होता
- मीटूचा आरोप असलेले चरणजीत मुख्यमंत्रिपदासाठी लायक नाहीत, काँग्रेसने त्यांना हटवावे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांची मागणी
- Corona Vaccine : गर्भवती महिला आणि नवजात बालकांवर लसीचा काय परिणाम होतो? सुप्रीम कोर्टाने केंद्राला मागितले उत्तर
- इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी तालिबानवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली, सीरियल बॉम्बस्फोटांचा केला दावा