• Download App
    संपर्क अभियानात उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेतील गटबाजीतून मारामारी|Shiv Sena factional fighting in Osmanabad district in Sampark Abhiyan

    संपर्क अभियानात उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेतील गटबाजीतून मारामारी

    विशेष प्रतिनिधी

    उस्मानाबाद : संपर्क अभियानाच्या कार्यक्रमातच उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेच्या दोन गटांत हाणामारी झाली आहे. या हाणामारीत शिवसेनेचे तालुका प्रमुख अण्णा जाधव गंभीर जखमी झाले आहेत. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि विद्यमान आमदार डॉ तानाजी सावंत यांच्या वादातून हा प्रकार घडला.Shiv Sena factional fighting in Osmanabad district in Sampark Abhiyan

    शिवसेनेच्या वतीने संपूर्ण राज्यभरात संपर्क अभियान कार्यक्रम सुरु करण्यात आला असून, या कार्यक्रमाद्वारे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यात येणार आहेत. मात्र, या कार्यक्रमातच गटबाजरी उफाळून आली. बॅनरवर फोटो न लावल्याच्या रागातून शिवसैनिकात आपआपसात हाणामारी झाली आहे.



    उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात हा प्रकार घडला. तब्बल २५ ते ३० जणांनी शिवसेनेचे तालुका प्रमुख अण्णा जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. हल्यात बाटल्या, लाठ्या काठ्या याचा उपयोग करण्यात आला होता. त्यामुळे तालुका प्रमुख अण्णा जाधव यांना जबर मार लागला असून, ते गंभीर जखमी झाले आहेत.

    माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा फोटो शिवसेना संपर्क अभियानात बॅनरवर न लावल्याने हा वाद झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या वादामुळे पुन्हा एकदा माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि विद्यमान आमदार डॉ तानाजी सावंत यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले आहेत.

    Shiv Sena factional fighting in Osmanabad district in Sampark Abhiyan

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ