प्रतिनिधी
मुंबई : शरद पवार आणि अजित पवार यांच्या “गुप्त” भेटीतून शरद पवारांच्या विश्वासार्हतेविषयी महाराष्ट्रात प्रचंड संशय तयार झाल्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बऱ्याच वर्षांनी आपली भूमिका पुन्हा बदलून शरद पवारांवर सडकून टीका केली आहे. Shiv Sena does not have hypocrisy like you in its DNA
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना संजय राऊत ज्या पद्धतीने सामनातून शरद पवारांवर टीकेचे आसूड ओढायचे, त्याच पद्धतीने आज संजय राऊत यांनी शरद पवार आणि रोहित पवारांवर टीकेचे आसूड ओढले आहेत. शिवसेनेच्या डीएनए मध्ये असले ढोंग नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी शरद पवार आणि रोहित पवारांचे वाभाडे काढले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणातल्या भीष्मपितामहाकडून हे अपेक्षित नाही, असा शब्दांत त्यांनी शरद पवार यांना सुनावले आहे, तर आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. तुमचे नातेसंबंध जपायचे असतील, जपा पण मग कार्यकर्त्यांनी तरी एकमेकांच्या विरोधात का लढायचे?? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पहिल्यांदाच शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. शरद पवार यांच्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण होतोय, असा आरोप त्यांनी केला. असा संभ्रम निर्माण करण्यावर खासदार राऊत यांनी टीका केली. आमदार रोहित पवार यांनी आम्हाला नातेसंबंध सांभाळावे लागत असल्याचे मत व्यक्त केले होते. यावरही संजय राऊत यांनी टीका केली.
शिवसेनेच्या डीएनमध्ये ढोंग नाही!!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत संभ्रम निर्माण होत आहे अशा प्रकारचा शिवसेनेचा डीएनए नाही शिवसेनेचा डीएनएने मध्ये कोणतेही ढोंग नाही असे देखील खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
Shiv Sena does not have hypocrisy like you in its DNA
महत्वाच्या बातम्या
- अमेरिकेच्या हवाईत शतकातील सर्वात भीषण वणवा; 89 जणांचा मृत्यू, 2 हजार इमारती भस्मसात
- भारतीय हवाई दल सुसज्ज, लडाखमध्ये पाठवले 68 हजार सैनिक; 90 टॅंकही एअरलिफ्ट, फायटर प्लेन स्क्वाड्रन तयार
- पवारांचे तळ्यात मळ्यात, काँग्रेसनेही राखले अंतर; पण प्रकाश आंबेडकरांची भाजप विरोधात भूमिका कठोर!!
- जेनेरिक औषधी न लिहिल्यास डॉक्टरांचे परवाना होणार निलंबित, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची नवीन नियमावली
- श्रीराम ग्रुपच्या संस्थापकांनी दान केले तब्बल ₹ 6 हजार कोटी; क्रेडिट स्कोर न पाहता लोन देतो ग्रुप