प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी पुढच्या निवडणूकीत आघाडी होईल की नाही, यावर संभ्रम कायम ठेवत मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियान करण्याचे आदेश दिले. राज्यातील शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी हे आदेश दिले. Shiv sena chief uddhav thakeray announces shiv sampark abhiyan; political answer to narayan rane
महाराष्ट्रात युती होईल किंवा आघाडी होईल की नाही याची चिंता करू नका. तुम्ही शिवसेना गावागावांत पोहोचवा, असे आदेश पक्षप्रमुखांनी दिल्याचे खासदार अनिल देसाई यांनी पत्रकारांना सांगितले. ते देखील बैठकीला उपस्थित होते. हे शिवसंपर्क अभियान १२ जुलै ते २४ जुलै या काळात राबवण्यात येणार आहे. तसेच जनतेची कामे करा, आपला पक्ष बळकट करा, असे आदेशही ठाकरे यांनी दिल्याचे देसाई यांनी सांगितले.
शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने उध्दव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या केंद्रीय मंत्रीपदाला देखील राजकीय प्रत्युत्तर दिल्याचे मानले जात आहे. नारायण राणे यांना भाजपने केंद्रीय मंत्रीपदी नेमून महाराष्ट्राची राजकीय असाइनमेंट दिली आहे. त्यांनी त्यावर आपले काम प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान सुरू करते आहे.
या अभियानात विधानसभानिहाय, तालुकानिहाय आणि पंचायत समितीनिहाय कामे करणे अपेक्षित आहे. अधिकाधिक गावांमध्ये पोहोचत लोकांशी संपर्क वाढवण्यावर या अभियानात भर दिला जाणार आहे. महाविकास आघाडी सरकार ज्या योजना रावबत आहे, त्या योजना लोकांपर्यंत पोहोत आहेत का, याची खातरजमा करा असे आदेश उध्दव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिले आहेत.
Shiv sena chief uddhav thakeray announces shiv sampark abhiyan; political answer to narayan rane
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानसाठी तस्करी करणाऱ्या दोन लष्करी जवानांना अटक, मादक पदार्थांच्या तस्करीची चौकशी करताना दोघे जाळ्यात
- लेबनान प्रचंड आर्थिक संकटात, जनतेचा उद्रेक होण्याची भीती
- गाझियाबादच्या दयावतींची दानशूरता, बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठास दान दिली १० कोटी रुपयांची जमीन दान
- Monsoon Session 2021 : पावसाळी अधिवेशनात काय कामकाज झाले? कोणती विधेयके – कोणते ठराव पास झाले? वाचा सविस्तर..