विशेष प्रतिनिधी
डोंबिवली : महापालिका कुठे काय करतेय, अशी परिस्थती डोंबिवलीत झाली आहे. शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्डयांमुळे शिवसेनाप्रमुखच सहकुटुंब पडून जखमी झाल्याची घटना घडली आहे.Shiv Sena branch chief Injured after falling due to a pit
डोंबिवलीमधील मंजुनाथ शाळेच्या परिसरात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. एखाद्या व्यक्तीला शेलार नाका ते टिळक चौक परिसर जायचे असेल तर अनेक खड्डे चुकवत जावे लागते. अशाच प्रकारे दसऱ्याच्या दिवशी डोंबिवली शिवसेना शाखा प्रमुख अजय घरत त्याची पत्नी व ३ वर्षाचा मुलगा यांना घेऊन मोटरसायकलवर बसून जात होते.
मंजुळा शाळेसमोर खड्डा चुकवत असताना मोटरसायकलचा तोल जाऊन ते रस्त्यावर पडले. मागून येणाऱ्या भरधाव गाडीने त्यांना गाडी उडवले नाही. अपघातात जीवित हानी झाली नाही. मात्र, खड्ड्यामुळे पडल्याने त्यांच्या पायाला व त्यांच्या मुलाच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. वारंवार तक्रार करून पालिका लक्ष देत नाही.
- शिवसेनेचा शाखाप्रमुखच खड्डयामुळे पडून जखमी
- डोंबिवलीतील खड्डे ठरत आहेत प्राणघातक
- शिवसेनाप्रमुखच सहकुटुंब पडून जखमी
- खड्डा चुकवत असताना मोटरसायकलचा तोल गेला
- पायाला व त्यांच्या मुलाच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत