प्रतिनिधी
मुंबई : मनिपुर मध्ये हिंसाचार उफाळलेला असताना तिथे महाराष्ट्रातील शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षिततेची काळजी वाटत आहे या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फोन करून विद्यार्थ्यांना काळजी करू नका!!, असा दिलासा दिला आहेShinde-Fadnavis government’s helping hand to Maharashtra students in Manipur
गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये परिस्थिती तणावाची आहे. तिथे सहा जिल्ह्यांमध्ये हिंसाचार उफाळला आहे.महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी NIT मणिपूरमध्ये शिकायला गेले आहेत. ते तणावात असल्याने राज्य सरकारने तातडीने पाऊले उचलली आहेत. स्थानिक तणावामुळे विद्यार्थी चिंतित आहेत. या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस केला.,
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना फोन करून, त्यांच्याशी चर्चा करून त्यांना सुरक्षिततेविषयी खात्री दिली आणि सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनीही मणिपूर पोलिस महासंचालकांना संपर्क केला.
देवेंद्र फडणवीस यांनीही तत्काळ मणिपूर सरकारशी संपर्क केला आणि या विद्यार्थ्यांना तत्काळ, परिस्थिती पूर्वपदावर येईस्तोवर त्यांना सुरक्षित वातावरणात ठेवण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांना येथे सुरक्षा मिळेल.
शिवाय या विद्यार्थ्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्याची सुद्धा व्यवस्था महाराष्ट्र सरकारच्या वतीने तत्काळ केली जात आहे. महाराष्ट्राचे प्रशासन सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.
Shinde-Fadnavis government’s helping hand to Maharashtra students in Manipur
महत्वाच्या बातम्या
- आफ्रिकन देश काँगोमध्ये पूर-भूस्खलनांचे तांडव, 176 जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले
- दिल्ली विद्यापीठाच्या बॉइज होस्टेलमध्ये विनापरवानगी गेले राहुल गांधी, विद्यापीठाने म्हटले- दौऱ्यामुळे विद्यार्थी नाराज, त्यांना जेवण मिळाले नाही
- ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, दोन दिवसांत बंपर कमाई, हॉलीवूडपटालाही मागे टाकणार
- मणिपूर हिंसाचारामुळे मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय बैठक, परिस्थिती सामान्य करण्याचे आवाहन; आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू