विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर ठाकरे गटाने भरलेल्या वेगवेगळ्या केसेस सुप्रीम कोर्टातून त्याबद्दल येणारा निर्णय यामुळे शिंदे – फडणवीस सरकारवर कायदेशीर अस्थिरतेचे सावट असताना सरकारने मात्र हे सावट झुगारून आपल्या स्थैर्यावर भर देत अर्थसंकल्पात जोर आणला आहे. पण हाच अर्थसंकल्प नुसता शब्दांचा फुलोरा, हवेचे बुडबुडे आणि गाजर हलवा असल्याची टीका करत महाविकास आघाडीने बैठकांवर भर दिला आहे.Shinde Fadanavis consolidated their grip on the government, but opposition thrust on meetings
गेम चेंजर योजना
नमो शेतकरी सन्मान योजनेत एकूण 12000 रुपये सव्वा ते दीड कोटी शेतकऱ्यांना देणे, एक रुपयात शेतकरी पिक विमा योजना, महिलांना एसटी भाड्यात 50 % सवलत, विद्यार्थ्यांना सरसकट मोफत गणवेश, लाडकी लेक योजनेचे विस्तृत स्वरूप, महात्मा फुले योजनेतील उपचारांचा खर्चाची मर्यादा दीड लाखावरून पाच लाख करणे, अंगणवाडी सेविका, शिक्षण सेवक यांचे मानधन वाढविणे, आदिवासी पाड्यांचे रस्ते एकमेकांना जोडणे, भीमाशंकर सह पाच ज्योतिर्लिंगांचे संवर्धन, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपये या काही गेम चेंजर योजना शिंदे फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात दिसत आहेत. त्याच्या तरतुदी देखील स्पष्ट आहेत.
अंबादास दानवे यांच्या घरी बैठक
पण हे दिसत असतानाही विरोधक मात्र त्यावर गाजर हलवा, शब्दांचे फुलोरे, हवेचे बुडबुडे अशा शब्दांमध्ये शरसंधान साधत आहेत.
काल उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक घेतली. आज त्याचेच एक्सटेंशन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या सरकारी निवासस्थानी झाले. अर्थसंकल्पात नेमक्या काय खोट काढायच्या आणि त्या विधिमंडळ अधिवेशनात कशा मांडायच्या??, याविषयी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठक झाल्याची बातमी आहे.
सरकार मात्र स्थिर
बिग ब्रेकिंग म्हणून अंबादास दानवे यांच्या घरी महाविकास आघाडीची खलबतं, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीच ही बातमी मराठी माध्यमांनी दिली आहे. अर्थसंकल्पात खोट काढण्यासंदर्भातच ही बैठक होती. पण त्याचवेळी सरकारला विधानसभेत बहुमत असल्यामुळे आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय होळीच्या सुट्टीनंतर येणार असल्यामुळे सरकारच्या स्थैर्यावर सध्या तरी परिणाम होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळेच सरकारने वेगवेगळ्या तरतुदींचा अर्थसंकल्पात जोर दिला आहे, पण महाविकास आघाडीने मात्र बैठका काढण्यावर नव्हे, तर घेण्यावर भर दिला आहे.
Shinde Fadanavis consolidated their grip on the government, but opposition thrust on meetings
महत्वाच्या बातम्या
- शरद हे शादाब असते तर सेक्युलरांनी त्यांना भाजपची बी टीम म्हटले असते का??, नागालँड वरून ओवैसींचा पवारांना टोला
- ‘’विरोधकांना हा अर्थसंकल्प निराशजनक वाटेल याबद्दल मनात काही शंका नाही, कारण…’’ सुधीर मुगंटीवारांनी लगावला टोला!
- Maharashtra Budget : शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात महापुरुषांच्या स्मारकांसाठीही भरघोस निधी जाहीर
- ‘’पाकिस्तानने जर मोदींच्या राजवटीत भारताला चिथावलं तर…’’ अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात दावा