• Download App
    अजितदादांचे बंड रोखण्यासाठीच पवारांची चाल; त्यांच्याच गटाचा अध्यक्ष नेमून राष्ट्रवादीतल्या फुटीला लगाम?? Sharad Pawar quit as NCP president, to curb ajit Pawar's rebellion

    अजितदादांचे बंड रोखण्यासाठीच पवारांची चाल; त्यांच्याच गटाचा अध्यक्ष नेमून राष्ट्रवादीतल्या फुटीला लगाम??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : खुंटा केला हलवून बळकट, डोळ्यातून काढले पाणी…!! हे जरी शरद पवारांनी आज 2 मे 2023 रोजी खरे काढून दाखवले असले, तरी प्रत्यक्षात अजितदादांचे संभाव्य बंड रोखण्यासाठीच त्यांनीही चाल खेळल्याचे राष्ट्रवादीतल्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले आहे. इतकेच नव्हे, तर स्वतःच्या मनापेक्षा अजितदादांच्या मनातला आणि गटातला अध्यक्ष बसवून राष्ट्रवादीच्या फुटीला पवारांनी लगाम घातल्याचेही बोलले जात आहे. Sharad Pawar quit as NCP president, to curb ajit Pawar’s rebellion

    शरद पवार आता माघारच घेणार नाहीत, हे गृहीत धरून राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष पदाची चर्चा जोर धरू लागली आहे. शरद पवारांच्या मनात असलेले नाव खासदार सुप्रिया  सुळे हे अर्थातच आघाडीवर आहे. पण त्या पाठोपाठ अजित पवार ,आमदार रोहित पवार यांचीही नावे समोर आहेत.

    त्यापलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार पुन्हा एकदा बंड करणार अशा बातम्या हवेत तरंगत असताना त्यांच्या संभाव्य बंडाला रोखण्यासाठी त्यांच्याच गटाचा, त्यांच्या विश्वासातला नेता म्हणून खासदार सुनील तटकरे यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी समोर आले आहे.

    याखेरीज शरद पवार हे काँग्रेसचा “सोनियानंतर राहुल” असा प्रयोग करणार का??, ही फार मोठी शंका राष्ट्रवादीच्या अंतर्गत वर्तुळातच व्यक्त होत आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर मध्येच त्याचा प्रत्यय आला. कारण शरद पवार अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असले तरी ते आपल्याबरोबरच राहतील. आपले मार्गदर्शक राहतील आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नवा अध्यक्ष काम करेल, हे सांगताना अनेकांनी सोनिया गांधींचे उदाहरण दिले. आज जरी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरेदी असली तरी पक्ष सोनिया गांधींच्याच नावाने चालतो, असे अजितदादा म्हणाले. त्यावर पक्षातल्या काही कार्यकर्त्यांनी पण आज काँग्रेसची अवस्था बघा. उत्तर प्रदेशात त्यांना लोकसभेला 5000 मतेही मिळत नाहीत, असा आवाज टाकला आणि काँग्रेसच्या सध्याच्या अवस्थेवर अतिशय टोकदार भाष्य केले.



    त्यामुळेच शरद पवार आपल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर “सुप्रिया अथवा रोहित प्रयोग” करतील का??, याविषयी शंका निर्माण झाली आहे.

    त्यामुळेच पवार घराण्यातील सोडून एक वेगळे नाव समोर आले आहे, ते खासदार सुनील तटकरे यांचे आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते म्हणून छगन भुजबळांचे नाव समोर येत आहे. पण ही सगळी नावे “पॉलिटिकल स्पेक्युलेशन”च्याच स्वरूपात आहेत.

    पवारांनी साताऱ्याच्या सभेत पावसात भिजून महाराष्ट्रातली राजकीय कॅल्क्युलेशन्स बदलली होती. आज दोन मे 2023 रोजी अचानक राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याची घोषणा करून पुन्हा तशी कॅल्क्युलेशन बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षपदाच्या नावाबाबतही पवार काहीतरी सरप्राईज एलिमेंट पुढे करतील, अशीच चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे.

    पण त्या “राजकीय सरप्राईज एलिमेंट” मधून राष्ट्रवादी काँग्रेस आपला 72 आमदारांचा आकडा ओलांडेल का?? आणि राष्ट्रवादीचे डबल डिजिटमध्ये खासदार निवडून येतील का?? हे सवा मात्र पवारांच्याच राजकीय कारकीर्द एवढे ठळक आहेत.

    Sharad Pawar quit as NCP president, to curb ajit Pawar’s rebellion

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!