• Download App
    सुप्रिया सुळे यांचे प्रमोशन आणि अजित दादांना "राजकीय अनशन"; पण प्रत्यक्षात अजित दादांचा "राजकीय ऑप्शन" खुला!!|Sharad pawar politically starved ajit pawar, but also opened an option for him!

    सुप्रिया सुळेंचे प्रमोशन, अजितदादांचे “राजकीय कुपोषण”; पण प्रत्यक्षात दादांना खुला “ऑप्शन”!!

    नाशिक : महाराष्ट्रातल्या नेते आणि कार्यकर्त्यांना दिल्लीत जाऊन “कात्रजचा घाट” दाखवत शरद पवारांनी राष्ट्रवादीतील भाकरी फिरवत प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. पण त्यावेळी अजित पवारांकडे कोणतीही जबाबदारी सोपवल्याची घोषणा केली नाही. हे एक प्रकारे अजितदादांचे “राजकीय कुपोषण” घडविण्याचा प्रकार आहे. त्यांना त्यांच्या कपॅसिटीनुसार कोणतेच पद न देणे हे अजितदादांचे राजकीय कुपोषणच आहे!!Sharad pawar politically starved ajit pawar, but also opened an option for him!

    मात्र, यानंतर अजित पवारांचाच हा मूळ प्रस्ताव होता, त्याचबरोबर अजित पवार कोणतेही प्रतिक्रिया न देता कार्यक्रमातून निघून गेले, अशा बातम्या आल्या. पण या सर्व राजकीय प्रक्रियेत अजितदादांचा “राजकीय ऑप्शन” शरद पवारांनी खुला करून दिला आहे, हे मात्र कोणाच्या लक्षात आलेले दिसत नाही.

    शरद पवार यांच्या आजच्या सरप्राईज घोषणेनंतर सुप्रिया सुळे यांनी अतिशय आनंदाने पक्षाने सोपवलेली नवी जबाबदारी स्वीकारली आहे. राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी, तर अजित पवारांनीच प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष नेमण्याचा प्रस्ताव शरद पवारांना निवृत्ती आधी दिला होता, अशा गौप्टस्फोट केल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. त्याच वेळी अजित दादा कोणतीही प्रतिक्रिया न व्यक्त करता दिल्लीतल्या कार्यक्रमातून निघून गेले, अशा बातम्याही आल्या. पण नंतर अजितदादांनी मनात महाराष्ट्र नजरेसमोर राष्ट्र असे सूचक ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली.

    पण शरद पवारांच्या आजच्या घोषणेतून सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब आणि दिल्ली या राज्यांची जबाबदारी सोपवून अजित दादांना कोणती जबाबदारी न सोपाविता हा खऱ्या अर्थाने अजितदादांना स्वबळावर “राजकीय ऑप्शन” शोधण्यासाठी दिलेली संधी देखील आहे!!



    – अजितदादांवर स्वतंत्र निर्णय घेण्याचा दबाव

    महाराष्ट्रात सुप्रिया सुळे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी देऊन त्यांच्या हाती पवारांनी “राजकीय सेंगोल” सोपवला असला तरी अजितदादांची स्वतःची विशिष्ट ताकद निश्चित आहे आणि अजितदादांना शरद पवारांनी डावलणे ही बाब महाराष्ट्रातल्या अजितदादा समर्थकांना रुचणे आणि पचणे फार कठीण आहे. यातूनच अजितदादा समर्थकांचा, “स्वतंत्र निर्णय घ्या”, असा अजित दादांवरचा दबाव वाढू शकतो. तसेच अजितदादांना देखील स्वतःचे आणि स्वतःच्या मुलांचे राजकीय भवितव्य निश्चित करताना “स्वतंत्रपणे” विचार करावाच लागेल. कारण राष्ट्रवादीत राहूनही जर कोणती तोलामोलाची जबाबदारी मिळणार नसेलच आणि स्वतःचे आणि मुलांचे राजकीय भवितव्य पणाला लागणार असेल, तर अजितदादांपुढे पक्षातच राहून कुचंबणा सहन करण्यापेक्षा दुसरा ऑप्शन नसेल. अशा स्थितीत स्वतः शरद पवारांनीच अजित दादांकडे कोणतीही जबाबदारी न देऊन त्यांचे “राजकीय कुपोषण” केले असले, तरी त्यांना “राजकीय ऑप्शन” देखील खुला करून दिला आहे, असे मानण्यास वाव आहे

    Sharad pawar politically starved ajit pawar, but also opened an option for him!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!