प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांना विश्वासात न घेता राजीनामा देऊन टाकला. त्यांनी सहकारी पक्षांची डायलॉग ठेवायला हवा होता, असे वक्तव्य करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महाविकास आघाडीत नवा राजकीय बॉम्ब गोळा टाकला आहे.Sharad Pawar now targets Uddhav Thackeray over his resignation of chief ministership in June 2022
याआधी राहुल गांधींनी अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समिती चौकशीची मागणी केल्यानंतर त्याला विरोध करून शरद पवारांनी महाविकास आघाडीत पहिला बॉम्ब गोळा टाकला होताच. पण आता थेट उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांना विश्वासात घेतले नाही, असा आरोप करून पवारांनी आज दुसरा राजकीय बॉम्ब गोळा टाकला आहे.
- ‘’घरात बसायचे ते आता रस्त्यावर येऊ लागले आहेत, फिरू लागले आहेत’’ एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला!
एनडीटीव्ही ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांची बाजू घेत हिंडेनबर्ग सारख्या परकीय संस्थेने दिलेल्या एका अहवालाच्या आधारे कुठल्याही देशातल्या उद्योगपतीला टार्गेट करण्याची गरज नाही असे सांगून काँग्रेसला टोचले होते. त्यावर देशात राजकीय गदारोळ उठला असतानाच एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना विश्वासात घेतले नाही आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाचा परस्पर राजीनामा देऊन टाकला, असा आरोप केला आहे. महाविकास आघाडीत तीन घटक पक्ष एकत्र आल्यानंतर संख्याबळाच्या आधारे पदे वाटली होती. मुख्यमंत्रीपद हे त्यातले महत्वाचे पद होते. ते शिवसेनेकडे गेले. पण शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर सहकारी पक्षांना विश्वासात न घेता उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. राजीनामा देणे न देणे हा त्यांचा अधिकार होता. पण त्यांनी सहकारी पक्षांची डायलॉग ठेवायला हवा होता, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. त्यामुळे महाविकास आघाडीतील राजकीय दरी अधिक रुंदावल्याचे स्पष्ट झाले आहे.
अदानी प्रकरणात शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आधीच त्यांच्यावर शरसंधान साधले आहेच, पण पवारांची एबीपी माझाची मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर याबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडून अद्याप स्पष्टीकरण यायचे आहे.
Sharad Pawar now targets Uddhav Thackeray over his resignation of chief ministership in June 2022
महत्वाच्या बातम्या
- आम आदमी पार्टीला राष्ट्रीय दर्जा; आनंदाचा क्षणी केजरीवालांना आली तिहार तुरुंगवासी मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांची आठवण!!
- राजकारण गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी सक्रिय पावले उचलली, निवडणूक आयोगाचे सुप्रीम कोर्टात शपथपत्र दाखल
- अर्थमंत्री सीतारामन यांनी पाश्चात्य देशांना दाखवला आरसा, म्हणाल्या- भारतातील मुस्लिम पाकिस्तानपेक्षाही सुखी, म्हणूनच त्यांच्यापेक्षा जास्त लोकसंख्या
- ‘तुम्ही फक्त ट्रोलिंगपुरते राहिलात’, ज्योतिरादित्य शिंदेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल; विचारले तीन प्रश्न