• Download App
    दोन दिवसांच्या दिल्ली भेटीत शरद पवार भाजपला पर्यायी ताकद निर्माण करण्याच्या तयारीत। sharad pawar in new delhi, may meet opposition leaders for uniting anti BJP forces

    दोन दिवसांच्या दिल्ली भेटीत शरद पवार भाजपला पर्यायी ताकद निर्माण करण्याच्या तयारीत

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : केंद्रातील सत्ताधारी भाजपला पर्यायी ताकद निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. ते २३ जूनपर्यंत दिल्लीत थांबून दोन दिवसांच्या दौऱ्यात काही नेत्यांशी राजकीय खलबते करण्याची शक्यता आहे. या खलबतांनंतर पवार मुंबईत परत येतील, असे सांगण्यात आले आहे. sharad pawar in new delhi, may meet opposition leaders for uniting anti BJP forces

    शस्त्रक्रियेनंतर गेल्या काही दिवसांपासून पवार हे मुंबईतील सिल्वर ओकमध्ये विश्रांती घेत होते. त्यांनी या काळात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी भोजनाच्या वेळी सुमारे ३ तास चर्चा केली होती. याला काही दिवस झाल्यानंतर पवार काल दिल्लीला दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले.

    २३ जूनपर्यंत ते राजधानीत राहणार असून यावेळी देशातील राजकीय स्थितीवर तसेच साडेतीन वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधात विरोधकांना एकत्र आणत रणनीती आखणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार हे विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे. फ्री प्रेस जर्नलने ही बातमी दिली आहे.



    राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी देखील शरद पवार हे २३ जूनपर्यंत दिल्लीत असण्याच्या बातमीला दुजोरा दिला आहेपरंतु, सूत्रांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. देशात भाजपाच्या विरोधात सशक्त पर्याय उभा करण्यासाठी शरद पवार हे फार पूर्वीपासून प्रयत्नशील आहेत. पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वीही पवारांनी तसे मत व्यक्त केले होते. पवार हे बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी जाणारही होते. परंतु, मध्येच त्यांचा पित्ताशयाचा आजार उद्भवल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. त्यामुळे ते प्रचारासाठी जाऊ शकले नाहीत, असे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले होते.  

    भाजपाला सशक्त पर्याय उभा राहावा हीच शरद पवार यांची योजना आहे. यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत, असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नबाब मलिक यांनी सांगितले होते. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत शरद पवार हे बिगर भाजपा पक्षांचे नेतृत् करतीलअसेही राष्ट्रवादीने सूचित केले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा दोन दिवसांचा दिल्ली दौरा फार महत्त्वाचा मानला जातो आहे. 

    sharad pawar in new delhi, may meet opposition leaders for uniting anti BJP forces

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!