प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील कुस्तीगीर परिषदेने अखिल भारतीय कुस्ती महासंघाच्या काही सूचना पाळल्या नाहीत म्हणून कुस्तीगीर परिषदेची समिती बरखास्त करावी लागली. त्या बरखास्तीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. मात्र हा खुलासा करताना महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या गेलेल्या सरकारवर आणि शिंदे – फडणवीसांच्या आलेल्या सरकारवर बोलण्यास शरद पवारांनी थेट नकार दिला आहे. Sharad Pawar denies to talk about MVA government and shinde Fadanavis government
अखिल भारतीय कुस्ती महासंघाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत काही फेरबदल करावेत. दुरुस्त्या कराव्यात, अशा सूचना महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांना 4 आठवड्यांपूर्वीच केल्या होत्या. अन्यथा कठोर कारवाई होईल, असा इशाराही मी दिला होता. परंतु माझ्या सूचनेनुसार महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत काही सुधारणा झाली नाही म्हणून अखिल भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची समिती बरखास्त केली.
आता दिल्लीमध्ये महाराष्ट्र भारतीय कुस्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून यासंदर्भात काही मार्ग निघतो का हे मी पाहणार आहे. त्यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत दुरुस्त्या केल्या की या कुस्तीगीर परिषदेला मान्यता मिळणे अवघड जाणार नाही, असे शरद पवारांनी टीव्ही 9 मराठीला सांगितले.
मात्र त्याचवेळी अँकर निखिलाने महाराष्ट्रातील सरकार संबंधी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायला शरद पवारांनी ठाम नकार दिला. आपण फक्त महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची संबंधित प्रश्न विचारण्यासाठी माझा वेळ मागून घेतला आहे. त्याविषयी प्रश्न विचारा. बाकीचे प्रश्न विचारून माझा आणि तुमचा वेळ खराब करू नका, असे शरद पवारांनी अँकर निखिलाला सुनावले. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बरखास्ती रद्द करण्या संदर्भात महाराष्ट्रातील सरकार कडून काही अपेक्षा करता का?, या प्रश्नावर देखील शरद पवारांनी बोलायला नकार दिला. या विषयावर बोलण्यासाठी तुम्ही माझी वेळ मागितलेली नाही. असले प्रश्न विचारून माझा आणि तुमचा दोघांचे वेळ खराब करू नका, असे शरद पवार पुन्हा एकदा म्हणाले आणि त्यांनी आपला बाईट संपवला.
Sharad Pawar denies to talk about MVA government and shinde Fadanavis government
महत्वाच्या बातम्या
- उदयपूर शिरच्छेद प्रकरण : आरोपीने दुचाकी क्रमांक ‘2611’ घेण्यासाठी दिले जास्त पैसे
- मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर शिवसेनेची एकनाथ शिंदेंविरोधात सर्वात मोठी कारवाई; नेतेपदावरून हटविले!
- द फोकस एक्सप्लेनर : शिंदे सरकारवर टांगती तलवार का? बंडखोर आमदार ठरल्यास पुढे काय? 11 जुलैला फैसला, वाचा सविस्तर…
- देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री : प्रस्थापित आणि पुरोगामी माध्यमांचा “दुःखयुक्त आनंद” किंवा “आनंदयुक्त दुःख”!!