प्रतिनिधी
अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस फोडून भाजपमध्ये जाणार अशा बातम्या महाराष्ट्राच्या राजकीय हवेत तरंगत असताना त्यांची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा देखील जाहीर झाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित दादांना सूचक पद्धतीने इशारा दिला आहे. यांना पक्षात फूट पाडायची ते पाडू शकतात. आम्ही आमची भूमिका घेऊ, असे असे वक्तव्य शरद पवारांनी अमरावतीत केले आहे. Sharad Pawar dares ajit Pawar to split NCP
अदानी जेपीसी वरून घुमजाव
त्याच वेळी शरद पवारांनी अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समिती अर्थात जेपीसी या मुद्द्यावर घुमजाव केले. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी गौतम आगामी यांची बाजू उचलून धरत सुप्रीम कोर्टाच्या समितीची चौकशी सुरू आहे. त्यामुळे जेपीसीची गरज नाही, असे वक्तव्य केले होते. मात्र काँग्रेस पक्ष जेपीसीच्या मागणीवर ठाम आहे त्यामुळे पवारांनी आता भूमिका बदलून सर्व विरोधक जेपीसी मुद्द्याची मागणी पुढे रडत असतील तर आपला विरोध असणार नाही, असे वक्तव्य करून आपल्या मूळ भूमिकेपासून घुमजाव केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून अजित पवार भाजपच्या गोटात जाऊन मुख्यमंत्री होणार असल्याच्या बातम्या महाराष्ट्राच्या राजकीय हवेत रंगत आहेत. सकाळला दिलेल्या मुलाखतीत अजितदादांनी स्वतःचे मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा देखील जाहीर केले आहे. त्यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करून त्यांना शुभेच्छा आणि टोले दोन्ही दिले आहेत.
तर शरद पवारांनी या विषयावर ज्यांना पक्षात फूट पाडायची ते पाडू शकतात. आम्ही आमची भूमिका घेऊ, अशा सूचक शब्दांमध्ये अजितदारांना इशारा दिला आहे.
Sharad Pawar dares ajit Pawar to split NCP
महत्वाच्या बातम्या
- कुपोषण संपवण्यासाठी राज्य सरकारची अनोखी मोहीम; अन्नाचा दर्जा तपासणाऱ्या ‘AI’ यंत्राचं लोकार्पण
- आसाम युवक काँग्रेसच्या महिला अध्यक्षाला छळणाऱ्या युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षांविरुद्ध आसाम पोलिसांची कठोर कायदेशीर कारवाई
- जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा देताना खासदार अमोल कोल्हेंनी दाखविली राजकीय प्रवासाची सूचक दिशा!!
- बुलढाण्याच्या भेंडवळ घटमांडणीचे भाकीत : राजा कायम राहणार, पण रोगराई पसरण्याची धोका, वाचा पावसाचा अंदाज