• Download App
    क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणात आणखी सात जणांना अटक |Seven more arrested in cryptocurrency fraud case

    क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणात आणखी सात जणांना अटक

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणात २००० गुंतवणूकदारांची ४० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रविवारी आणखी सात जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता ११ झाली आहे. Seven more arrested in cryptocurrency fraud case

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी निशिद वासनिक, त्याची पत्नी आणि दोन साथीदारांना एक दिवसापूर्वी पुण्यातील लोणावळा येथून अटक करण्यात आली होती. एका अधिकाऱ्याने सांगितले की, निशिद वासनिक आपली आलिशान जीवनशैली दाखवून लोकांना कंपनीत गुंतवणूक करण्यास फसवत होता.



    अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “त्यांनी २०१७ आणि २०२१ दरम्यान फसवणूक करून त्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले आणि गुंतवणुकीच्या मूल्यात सतत वाढ दर्शवण्यासाठी कंपनीच्या वेबसाइटवर फेरफार केला.” त्यांनी मध्य प्रदेशातील पचमढी येथे क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीवर चर्चासत्रही आयोजित केले होते.

    निशिद वासनिक गेल्या वर्षी मार्चमध्ये गुंतवणूकदारांना वेठीस धरून पळून गेला होता. त्याला शनिवारी पुण्यातून अटक करण्यात आली.त्याच वेळी, रविवारी यशोधरा नगर पोलिसांनी सात जणांसह सर्व ११ आरोपींविरुद्ध आयपीसी (भारतीय दंड संहिता), महाराष्ट्र ठेवीदारांचे संरक्षण कायदा आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला. आहे.

    Seven more arrested in cryptocurrency fraud case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस