• Download App
    Sena Vs Congress : शिवसेनेने पर्सनल पार्टी फंडाद्वारे लस विकत घेतल्या आहेत ; ‘मातोश्री’च्या अंगणातून ठाकरे सरकारला घरचा आहेर ...।Sena Vs Congress : Bandra East Congress MLA Zeeshan Siddique slams Shivsena for posters on Corona Vaccination Centre

    Sena Vs Congress : शिवसेनेने पर्सनल पार्टी फंडाद्वारे लस विकत घेतल्या आहेत ; ‘मातोश्री’च्या अंगणातून ठाकरे सरकारला घरचा आहेर …

    झिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार आहेत. काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचे ते सुपुत्र. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असताना झिशान सिद्दीकी यांनी वांद्रे पूर्व हा हायप्रोफाईल मतदारसंघ जिंकला होता.


    वांद्रे पूर्वमधून शिवसेनेकडून माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना तिकीट देण्यात आलं होतं. तर तत्कालीन आमदार तृप्ती सावंत यांचं तिकीट कापल्याने त्यांनी बंडखोरी केली होती. दोघांमधील वादाचा फटका शिवसेनेला बसला आणि झिशान सिद्दीकी यांनी भरघोस मतांसह बाजी मारली.


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले खरे मात्र यांच्याद नेहमीच वाद सुरू असतात .एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून तीन्ही पक्ष कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात .विशेष करून कॉंग्रेसला फारसे महत्व दिले जात नसल्याने ह्या न त्या प्रकारे कॉंग्रेस नेते आपली नाराजी व्यक्त करतात. आता वांद्रे पूर्व भागातील नव्या लसीकरण केंद्राच्या उद्घाटनावरुन थेट शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर नाराज  काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी पुन्हा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.  Sena Vs Congress :Bandra East Congress MLA Zeeshan Siddique slams Shivsena for posters on Corona Vaccination Centre

    वांद्रे पूर्व भागातील शिवसेनेच्या भव्य लसीकरण उत्सवात आपले स्वागत आहे. इथे लसींपेक्षा पोस्टर्स जास्त आहेत. शिवसेनेच्या पर्सनल पार्टी फंडाद्वारे लस विकत घेतल्या आहेत का? कारण मला कुठेही महाविकास आघाडीचा उल्लेख दिसत नाही. लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनाचे उदात्तीकरण थांबवा, हे आपले कर्तव्य आहे! अशा शब्दात झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेला फैलावर घेतले आहे. झिशान यांनी आपल्या ट्विटरवर लसीकरण केंद्राजवळील शिवसेनेच्या तीन-चार पोस्टर्सचे फोटोही शेअर केले आहेत.

    वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात ‘मातोश्री’ हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान येते. ‘मातोश्री’च्या अंगणातच काँग्रेसकडून पराभवाचा झटका स्वीकारण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढावली होती. आपण ठाकरे कुटुंबाच्या मतदारसंघात असल्याने पाच वर्षांनी त्यांनी मला मतदान करावं, इतकं चांगलं काम करण्याची माझी इच्छा असल्याचं झिशान निकालानंतर म्हणाले होते.

    झिशान सिद्दीकी अनिल परब वाद

    वांद्रे पूर्वमधील लसीकरण केंद्राचं उद्घाटन परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. पण या कार्यक्रमात डाववल्यामुळे काँग्रेसचे स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी यांनी नाराजी व्यक्त केली होती. माझ्या वांद्रे पूर्व मतदारसंघात कोरोना लसीकरण केंद्राचं उद्घाटन शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आलं. स्थानिक आमदार या नात्याने प्रोटोकॉलनुसार या उद्घाटनाला मला का बोलावण्यातं आलं नाही? असा सवाल आमदार झिशान सिद्दीकी यांनी ट्वीट करत शिवसेनेला विचारला होता.

    Sena Vs Congress : Bandra East Congress MLA Zeeshan Siddique slams Shivsena for posters on Corona Vaccination Centre

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस