• Download App
    समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर दुसऱ्या टप्प्याचे शिंदे - फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण|second phase of Samriddhi Highway from Shirdi to Bharveer by Fadnavis

    समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर दुसऱ्या टप्प्याचे शिंदे – फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

    प्रतिनिधी

    शिर्डी : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या प्रकल्पाच्या शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.second phase of Samriddhi Highway from Shirdi to Bharveer by Fadnavis

    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या ५२० किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर या महामार्गाच्या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज करण्यात आले. त्यामुळे आता ६०० किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग नागरिकांसाठी खुला झाला आहे. राज्यातील युती सरकार हे शब्द पाळणारे सरकार असून येत्या डिसेंबरपर्यंत संपूर्ण महामार्ग नागरिकांच्या सेवेत दाखल होईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला.



    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्ग हा अनेकांना स्वप्नवत वाटत होता. मात्र आम्ही हे स्वप्न प्रत्यक्षात आणले. त्यासाठी अनेक अडथळे आले, काही मुद्दाम आणले गेले, मात्र तरीही आम्ही ते स्वप्न पूर्ण केले. जिद्द चिकाटी आणि काही करून दाखवण्याची क्षमता असेल तर काय घडू शकते याचे समृद्धी महामार्ग हे आदर्श उदाहरण असल्याचे यावेळी सांगितले. लोकांना पैसे मिळतील की नाही यावर विश्वास नव्हता पण मी स्वतः साक्षीदार म्हणून सही केली आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी सह्या दिल्या. मला विचारतात समृद्धी नक्की कुणाची झाली तर त्यांना मी सांगतो की शेतकऱ्यांची झाली कारण या महामार्गाने त्यांचे आयुष्य समृद्ध झालेच पण त्यासोबत आधी होती त्यापेक्षा जास्त जमीन घेऊन व्यवसाय सुरू करून त्यांनी त्या व्यवसायाला समृद्धी असे नाव दिले. समृद्धी महामार्ग बनताना जे शेतकरी जागा द्यायला तयार नव्हते तेच नवनगरे तयार करताना स्वतःहून आपली जमीन देताहेत हे चित्र बदलण्याचे काम ह्या महामार्गाने केल्याचे सांगितले.

    या दुसऱ्या टप्प्यामुळे ठाणे, मुंबई येथून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक गतिमान होईल. तसेच शिर्डी, अहमदनगर, सिन्नर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबईत यायला लागणारा कालावधी देखील कमी होणार आहे.

    भविष्यात शिर्डी विमानतळ राज्यातील अत्यंत गजबजलेला विमानतळ ठरणार असून त्याची तरतूद म्हणून नवीन टर्मिनल इमारतीसाठी ६०० कोटींची तरतूद केली आहे. त्याचे भूमिपूजन करण्यासाठी मी जुलै महिन्यात नक्की शिर्डीला येईन, असेही त्यांनी सांगितले.

    याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, राज्य पायाभूत सुविधा वॉर रुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार, एमएसआरडीसीचे सह-व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, कैलास शिंदे, संजय यादव, आमदार राम कदम, आमदार प्रा. रमेश बोरनारे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार मोनिका राजळे, स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड, आणि एमएसआरडीसीचे इतर सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    second phase of Samriddhi Highway from Shirdi to Bharveer by Fadnavis

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा