वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील सुधारणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत राज्यपाल कोश्यारी यांनी आता मुंबई विद्यापीठासाठी नव्या कुलगुरू यांचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. Search for Vice-Chancellor by Governor Koshyari; Ignoring government-amended legislation
मंत्रिमंडळाने तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील सुधारणा कायदा मंजूर केला होता. पण, त्याकडे राज्यपाल यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. तसेच मुंबई विद्यापीठाचा नवीन कुलगुरू नेमण्यासाठी बैठक घ्यावी, अशी सूचना व्यवस्थापकीय आणि शैक्षणिक परिषदेला केली आहे.
डिसेंबर २०२१ मध्ये, राज्य सरकारने कुलगुरु निवड पद्धतीत बदल केला. ज्या अंतर्गत राज्य आता निवड पॅनेलद्वारे निवडलेल्या पाच नामनिर्देशित व्यक्तींची यादी प्राप्त करेल. दोघांची निवड करेल आणि ती राज्यपाल यांच्याकडे पाठवेल. त्या द्वारे राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू निवडले जाणार होते. पण, या प्रक्रियेकडे राज्यपालांनी साफ दुर्लक्ष केले असून कुलगुरु निवडीसाठी स्वतंत्र सूचना केल्या आहेत.
Search for Vice-Chancellor by Governor Koshyari; Ignoring government-amended legislation
महत्त्वाच्या बातम्या
- Vinay Kwatra new Foreign Secretary : विनय मोहन क्वात्रा भारताचे नवे परराष्ट्र सचिव, हर्षवर्धन श्रृंगला यांची जागा घेणार
- काश्मीरमध्ये बांधले जातेय देवी सरस्वतीचे मंदिर ; सप्टेंबरपर्यंत तयार होणार, पीओकेमधील शारदा पीठापर्यंत कॉरिडॉर बांधण्याचीही मागणी
- आंध्र प्रदेशात एकाच वेळी 13 जिल्ह्यांची निर्मिती ; राज्यातील प्रत्येक जिल्ह्यापासून वेगळा केला एक जिल्हा, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचा मोठा निर्णय
- चायनीज लोन अँप् रॅकेटला अटक ;कर्ज वसुलीसाठी पाठवायचे महिलांचे न्यूड फोटो, क्रिप्टोकरन्सीने चीन-दुबईत गुंतवायचे पैसा