Thursday, 1 May 2025
  • Download App
    पुण्यात स्कूल बसचे रूपांतर शववाहिकेत ; रूग्णवाहिकांच्या त्रुटींमुळे निर्णय : चालकांना एक वर्षानंतर रोजगार|School bus converted to hearse in Pune; Decision due to ambulance errors: Employers after one year of employment

    पुण्यात स्कूल बसचे रूपांतर शववाहिकेत : रूग्णवाहिकांच्या त्रुटींमुळे निर्णय ; चालकांना एक वर्षानंतर रोजगार

    वृत्तसंस्था

    पुणे : शहरात शववाहिका कमी पडत असल्यामुळे स्कूल बसचा शववाहिका म्हणून वापर करण्यात येणार आहे. आरटीओ कार्यालयाच्या सहकार्यातून पुणे महापालिकेस 10 स्कूल बस देण्यात आल्या आहेत.School bus converted to hearse in Pune; Decision due to ambulance errors: Employers after one year of employment

    मागील काही दिवसांपासून मृत रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शववाहिका कमी पडत आहेत. टेम्पो ट्रॅव्हलर, स्कूल बसमधील पॅसेंजर सीट काढून त्याचा वापर शववाहिका म्हणून करता येऊ शकतो.



    या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे अशा बसची मागणी केली होती. महापालिकेस त्यांनी 10 बस भाडेतत्वावर दिल्या आहेत.

    या वाहनाचे भाडे, चालक भत्ते व मानधन महापालिका देणार आहे. या वाहनांसाठी महापालिका प्रतिदिन 1 हजार 600 रूपये भाडे देणार आहे. यामुळे स्कूल बसचालकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

    School bus converted to hearse in Pune; Decision due to ambulance errors: Employers after one year of employment

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    फडणवीस सरकारने स्वतःच घेतलेल्या परीक्षेत सरकार 78 % गुण मिळवून पास; पण काही विभागांमध्ये नापास!!

    Chief Minister Fadnavis : जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाने सामाजिक न्यायाचे पर्व सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही केले निर्णयाचे स्वागत

    Sarsanghchalak : सरसंघचालकांच्या हस्ते काशीमध्ये मजुराच्या मुलीचे कन्यादान; वराला म्हणाले- माझ्या मुलीची काळजी घ्या!