समर्थकांनी असा आरोप केला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आ.शिंदे यांना अडचणीत आणले आहे. ‘शशिकांत शिंदे यांचा विजय असो’, ‘टायगर अभी जिंदा है’ अशी घोषणाबाजी केली. Satara: Stone pelting at NCP office; Protesters accuse MLA Shinde of causing trouble
विशेष प्रतिनिधी
सातारा : गेल्या महिनाभरापासून जिल्हा बँक निवडणुकीचे धुमशान सुरू होते. राजकीय दृष्ट्या ही निवडणुकी महत्त्वाची मानली जात होती. त्यामुळे या निवडणुकीत साताराच्या आजी-माजी पालकमंत्र्यांचं अस्तित्व पणाला लागले होतं. यावेळी सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्याचे माजी अध्यक्ष व माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे यांचा जावळी सोसायटी मतदारसंघातून एक मताने पराभव झाला.
त्यामुळे आ.शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करत निषेध केला.यावेळी समर्थकांनी असा आरोप केला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आ.शिंदे यांना अडचणीत आणले आहे. ‘शशिकांत शिंदे यांचा विजय असो’, ‘टायगर अभी जिंदा है’ अशी घोषणाबाजी करत पराभवाचा वचपा योग्य वेळी काढू अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
जावळी सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि भाजपचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक ज्ञामदेव रांजणे यांच्यात लढत झाली. या मतदारसंघात चुरशीने ४९ पैकी ४९ मतदान झाले होते. त्यामुळे निकालाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.मंगळवारी मतमोजणी वेळी पहिला निकाल जावळीचा लागला.यात एक मताने रांजणे विजयी झाले.
Satara: Stone pelting at NCP office; Protesters accuse MLA Shinde of causing trouble
-
महत्त्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जी आज दिल्ली दौऱ्यावर तोफा भाजपवर; पण फोडणार काँग्रेसच; कीर्ति आझाद तृणमूळ काँग्रेसमध्ये येणार
- रामायण स्पेशल ट्रेनमध्ये वेटर्सचा भगवे कपडे घातल्याने वाद, साधू-संतांनी घेतला आक्षेप
- सीबीआय, ईडी, रॉ यांना विनापरवानगी कोणाचीही माहिती घेण्याचा अधिकार, वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयकावरील अहवाल संसदीय समितीने स्वीकारला, काँग्रेस आणि तृणमूलचा विरोध
- सरन्यायाधीश एन. व्ही.रमणा : लोकशाहीतील सर्वच सत्ताधाऱ्यांनी दिनक्रम सुरु करण्यापूर्वी स्वतःच आत्मपरीक्षण करावं