विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे भ्रष्टाचार उघडकीस आणत आहेत. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांनाच पत्र लिहून मोठा स्फोट केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली ५०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा झाल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.Sanjay Raut’s letter directly to Somaiya! Somaiya exposes Rs 500 crore scam
संजय राऊत यांनी ट्वीट करून दोन पत्र सोमय्यांना लिहिलं आहे. या प्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून चौकशी व्हावी अशी मागणीच राऊत यांनी सोमय्यांकडे केली आहे.
नेमक काय लिहिलं आहे या पत्रात
संजय राऊत यांनी सोमय्या यांना लिहिलेल्या पत्रात पिंपरी चिंचवड पालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात ५०० ते ७०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. “पिंपरी चिंचवड दौऱ्यात सुलभा उबाळे आणि इतर प्रमुख नेत्यांनी माझ्याकडे या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे सोपवली.
२०१८-१९ या आर्थिक वर्षात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शेकडो कोटींच्या निविदा काढण्यात आल्या. या निविदा सदोष होत्या. यात क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि आर्कुस या दोन कंत्राटदारांना ५०० कोटीपेक्षा अधिकची कंत्राटे देण्यात आली. ”
पुढे संजय राऊत म्हणले की , कामांसाठी ठरवून दिलेली मुदत संपूनही ५० टक्के कामेही या कंत्राटदारांनी पूर्ण केली नाहीत. दोन कंपन्यांच्या हितासाठी हे सगळं करण्यात आलं आणि सरकार व जनतेचा पैसा या कंत्राटदारांच्या घशात घालण्यात आला.
तसेच संपूर्ण प्रकल्पातच मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून आपण अनेक घोटाळे बाहेर काढले असल्याने मी तुमचे या घोटाळ्याकडे लक्ष वेधत आहे, असे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे. या घोटाळ्याचे पुरावे असलेली संपूर्ण फाइल मी तुमच्याकडे सोपवत आहे, असे नमूद करताना त्याचे कारणही राऊत यांनी पुढे नमूद केले आहे.
Sanjay Raut’s letter directly to Somaiya! Somaiya exposes Rs 500 crore scam
महत्त्वाच्या बातम्या
- फक्त उत्तर प्रदेशातच महिलांसाठी 40 टक्के जागा का, इतर राज्यांत महिला नाहीत?’ मायावतींचा काँग्रेसवर निशाणा
- भाजपने मला १०० कोटींची ऑफर दिलेली , शशिकांत शिंदेंच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकर यांनी दिली ‘ ही ‘ प्रतिक्रिया
- Lakhimpur : रात्री उशिरापर्यंत रिपोर्ट ची वाट पाहिली ; योगी सरकारला सुप्रीम कोर्टाने फटकारले , पुढील सुनावणी २६ ऑक्टोबरला होणार
- सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवून पुण्यात 31 वर्षीय तरुणीवर सलग दोन वर्षे बलात्कार
- कॅप्टन साहेबांनी धर्मनिरपेक्ष अमरिंदरसिंगांना “मारले”;काँग्रेसचे नेते एकापाठोपाठ एक बरसले