बांगलादेशात काही हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली. याच्या निषेधार्थ त्रिपुरामध्ये हिंदू संघटनांनी निदर्शने केली. तेथील मशिदींचे नुकसान झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या. या ठिणगीने महाराष्ट्रात वणवा पेटला आणि अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे हिंसाचार उसळला. रझा अकादमीने महाराष्ट्रात दंगल घडवून आणल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. Sanjay Raut Comment over maharashtra violence, claims it is a conspiracy to destabilase maha vikas aghadi govt
वृत्तसंस्था
मुंबई : बांगलादेशात काही हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली. याच्या निषेधार्थ त्रिपुरामध्ये हिंदू संघटनांनी निदर्शने केली. तेथील मशिदींचे नुकसान झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या. या ठिणगीने महाराष्ट्रात वणवा पेटला आणि अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे हिंसाचार उसळला. रझा अकादमीने महाराष्ट्रात दंगल घडवून आणल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. रझा अकादमीकडून जाणूनबुजून पॅम्प्लेटचे वाटप करण्यात आले आणि त्यातून समाज नष्ट होत असल्याचा अपप्रचार करण्यात आला. यानंतर हिंसाचाराचा कट रचला गेला. असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. रझा अकादमी ही महाविकास आघाडीची पिल्लू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
त्याला उत्तर देताना आज (१४ नोव्हेंबर, रविवार) संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्रिपुरातील घटनेचा परिणाम फक्त महाराष्ट्रातच का होत आहे, असा सवाल उपस्थित केला. यूपीमध्ये का नाही झाले? मध्य प्रदेशात का घडले नाही? ते हरियाणा, कर्नाटक, बिहारमध्ये का झाले नाही? हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध फक्त महाराष्ट्र आणि त्रिपुरातच का दिसतो? असे ते म्हणाले.
‘महाराष्ट्रात दंगल भडकावून सरकार अस्थिर करण्याचा डाव’
संजय राऊत म्हणाले, ‘देशभर हिंदू आहेत, सर्वत्र प्रतिक्रिया उमटल्या पाहिजेत. पण प्रतिक्रिया उमटतात फक्त अमरावती, मराठवाड्यात. रझा अकादमीला कुप्रसिद्ध इतिहास आहे. पण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात अशा प्रकारे दंगली घडवून आणण्याची क्षमता त्याच्यात नाही. खरे तर महाराष्ट्राची निवड जाणीवपूर्वक करण्यात आली. त्रिपुरातून इथं दंगल भडकवण्यात आली कारण इथं राज्य सरकार अस्थिर होऊ शकतं. कुठेतरी हिंदूंवर अत्याचार होत असतील तर इतर राज्यातही मोर्चे निघायला हवेत, फक्त महाराष्ट्र आणि त्रिपुरातच का? कारण महाराष्ट्र अस्थिर करून देशात तणाव निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. नुकत्याच झालेल्या १३ राज्यांतील निवडणुकांचे निकाल भाजपच्या बाजूने लागलेले नाहीत. त्यामुळे वातावरणनिर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत.
‘हिंदूंवरील अत्याचाराविरोधात त्रिपुरात आंदोलन का? दिल्लीत का नाही?’
संजय राऊत म्हणाले, ‘बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात त्रिपुरामध्ये आंदोलने का झाली? दिल्लीत का नाही? बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात प्रथम दिल्लीत निदर्शने व्हायला हवी होती. बांगलादेश सोडा, काश्मीरमध्ये हिंदू पंडितांवर अत्याचार होत आहेत. काल मणिपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका कर्नलचे कुटुंब शहीद झाले होते. याचा दिल्लीत एकत्र निषेध करूया.
संजय राऊत पुढे म्हणाले की, ‘जर या देशात हिंदूंना खरोखरच धोका असेल तर मी म्हणेन की सरसंघचालक मोहनराव भागवत साहेबांनी दिल्लीत आंदोलनाचे नेतृत्व करावे. आम्हीही एकत्र येऊ. पण तसे होणार नाही, त्रिपुरात निदर्शने झाली कारण ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. त्रिपुरामध्ये एक षडयंत्र रचले जात आहे, संपूर्ण देशाचे वातावरण बिघडत आहे.”
Sanjay Raut Comment over maharashtra violence, claims it is a conspiracy to destabilase maha vikas aghadi govt
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी