• Download App
    महाविकास आघाडीत तुझं नी माझं जमेना : संजय राऊत अन् नाना पटोले आमने-सामने ; थेट मुख्यमंत्र्यांना इशारा | Sanjay Raut Annana Patole face to face

    आमने-सामने : पवारांच्या ‘प्रवक्तेपदा’वरून संजय राऊत यांना नाना पटोलेंनी केले पुन्हा लक्ष्य

    • परमबीर सिंह यांचे आरोप आणि सचिन वाझे प्रकरण यामुळे महाविकास आघाडी सरकारची मोठी बदनामी झाल्याने घटकपक्ष म्हणून याचा फटका काँग्रेस पक्षालाही सहन करावा लागत आहे. त्यावर बैठकीत अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
    • राज्यातील महाविकास आघाडी सरकार निधी वाटपात पक्षीय दुजाभाव करत असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मिळालेल्या खात्यांना पुरेसा निधी दिला जातो, अशी तक्रार काँग्रेसच्या सर्वच मंत्र्यांची आहे. 
    • राज्याच्या विकासासह, मुंबईतील गुन्हेगारी, वाढते करोना रुग्ण यासह महाविकास आघाडीमधील निधीवाटपाचा मुद्दाही चर्चेत आला. त्यातील अनेक मुद्द्यांवर आक्षेप नोंदवत काँग्रेस पक्षाने शिवसेना-राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांचं एक वक्तव्य हे काँग्रेसला चांगलंच झोंबलं आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेसच्या नेत्यांची जी बैठक झाली त्या बैठकीत त्यांनी संजय राऊत यांच्या त्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. Sanjay Raut Annana Patole face to face

    आधीच कॉंग्रेस आणि शिवसेनेत या ना त्या कारणास्तव वाद सुरू असतात. काँग्रेस पक्ष निधी वाटपावरुन नाराज आहे त्यातच संजय राऊतांमुळे महाविकास आघाडीत चांगलीच खडाखडी सुरू आहे.



    काँग्रेस पक्षाने यूपीएच्या अध्यक्षपदाचा हट्ट सोडला नाही तर मग राष्ट्रीय स्तरावरचे नेते यूपीए २ स्थापन करण्याची तयारी करत आहेत. हा निश्चित चिंतेचा विषय आहे त्यामुळे यूपीएचं अध्यक्षपद शरद पवार यांना दिलं गेलं पाहिजे. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं.

    संजय राऊत यांनी हे वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला.

    खासदार संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते झाले आहेत. ते शिवसेनेचे खासदार किंवा प्रवक्ते राहिलेले नाहीत. कारण ते सातत्याने अशा प्रकारचं वक्तव्य कत आहेत. शिवसेना ही यूपीएची सदस्य नाही. जर शिवसेना यूपीएची सदस्य नाही तर त्या पद्धतीचं वक्तव्य करण्याचा अधिकार त्यांना नाही असं माझं मत आहे. मात्र संजय राऊत अजूनही त्याच पद्धतीने बोलत आहेत.आमच्या नेत्यांच्या बद्दल कुठल्याही व्यक्तीने या पद्धतीने वक्तव्य करणं हे आम्हाला मान्य नाही.

    महाविकास आघाडीच्या सुरवातीच्या काळात नवाब मलिक यांनी एक ट्विट केलं होतं ते ट्विट संजय राऊत यांनी चांगलच फॉलो केलेलं दिसतंय.

    काय होत ते ट्विट –

    धिरे धिरे प्यार को बढाना है!हद से गुजर जाना है!

    Sanjay Raut Annana Patole face to face

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!