• Download App
    २ कोटींची खंडणी आणि शरद पवारांचे मतपरिवर्तन…??; सचिन वाझेंच्या लेटरबाँम्बमधील खुलाशावरून “कोटीमोला”चा सवाल!! याचे उत्तर कोण देणार…?? | chin vaze letter bomb; did anil deshmukh convinced sharad pawar for vaze`s reinstatement?

    २ कोटींची खंडणी आणि शरद पवारांचे मतपरिवर्तन…??; सचिन वाझेंच्या लेटरबाँम्बमधील खुलाशावरून “कोटीमोला”चा सवाल!! याचे उत्तर कोण देणार…??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – पोलीस सेवेत घेऊन आपली नियुक्ती करण्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. ते आपल्याला हटवू इच्छित होते. पण त्यांचे मतपरिवर्तन करून मला गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखेत नियुक्ती देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असा खळबळजनक दावा सचिन वाझे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रात केला केला आहे. ‘इंडिया टुडे’ने ही बातमी दिली आहे. sachin vaze letter bomb; did anil deshmukh convinced sharad pawar for vaze`s reinstatement?

    पण याच खळबळजनक दाव्याने काही सवाल खडे केले आहेत. ते म्हणजे अनिल देशमुखांनी शरद पवारांच्या नावाने सचिन वाझेंकडे खंडणी मागितली होती का…?? ती त्यांनी दिली होती का…?? आणि शरद पवारांचे मतपरिवर्तन झाले होते का…??



    कारण सचिन वाझेंना 2020 मध्ये कोविडच्या सुरूवातीच्या काळात सेवेत घेतले गेले होते. म्हणजे त्यांची मार्च ते एप्रिल २०२० मध्ये मुंबई पोलीस सेवेत नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आज म्हणजे ७ एप्रिल २०२१ पर्यंत म्हणजे सुमारे वर्षभर सचिन वाझे मुंबई पोलीसांशी संबंधित होते. ते सध्या निलंबित आहेत. त्यांना गेल्याच महिन्यात निलंबित केले आहे.

    सचिन वाझेंना गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखेत नियुक्ती मिळाली होतीच. याचा अर्थ शरद पवारांचे मतपरिवर्तन झाले होते का…?? ते अनिल देशमुखांनी केले होते का…?? केले असल्यास कोणत्या प्रकारे मतपरिवर्तन केले होते…?? याचे खुलासे होणे आता बाकी आहे. कारण सचिन वाझे निलंबित झाले तेव्हा ते गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखेतच नियुक्तीला होते.

    sachin vaze letter bomb; did anil deshmukh convinced sharad pawar for vaze`s reinstatement?

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!