• Download App
    सचिन सावंत यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल ; म्हणाले - 'भाजप मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करतेय.' । Sachin Sawant attacks BJP government; Said - 'BJP compares Modi with Shivaji Maharaj.'

    सचिन सावंत यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल ; म्हणाले – ‘भाजप मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करतेय.’

    समाजकंटकांनी गुरुवारी रात्री पुतळ्यावर काळा रंग ओतल्याने संतापाची लाट उसळली आहे. शिवप्रेमी आक्रमक झाले असून बेळगावमध्ये दगडफेक करण्यात आली. Sachin Sawant attacks BJP government; Said – ‘BJP compares Modi with Shivaji Maharaj.’


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बंगळूर येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. समाजकंटकांनी गुरुवारी रात्री पुतळ्यावर काळा रंग ओतल्याने संतापाची लाट उसळली आहे. शिवप्रेमी आक्रमक झाले असून बेळगावमध्ये दगडफेक करण्यात आली. त्यावरूनच काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.यावेळी सावंत म्हणले की,भाजप मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करतेय.महाराष्ट्र हे कदापी सहन करणार नाही

    पुढे सावंत म्हणले की , ”बंगळुरुला महाराष्ट्राचे मानबिंदू व आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना असहनीय आहे. तर चंद्रकांत पाटील महाराजांनी व्होट बँक तयार केली असे म्हणून महाराजांचा अवमान करतात. महाराष्टात हे अजिबात खपून घेतल जाणार नाही”



    छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केलेल्या घटनेचा निषेध नोंदवताना सावंत म्हणाले की , ”शिवरायांच्या नावाचा उपयोग संधीसाधू राजकारणासाठी करायचा आणि महाराजांनाच कमी लेखायचे हा भाजपाचा कट आहे. पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. कर्नाटकमधील भाजपा सरकार मराठी भाषिकांवर भयंकर अत्याचार करत आहे. भाजपने भूमिका स्पष्ट करावी”, अशी मागणी करत त्यांनी केली.

    Sachin Sawant attacks BJP government; Said – ‘BJP compares Modi with Shivaji Maharaj.’

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!